मान्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षा

By admin | Published: July 16, 2015 12:35 AM2015-07-16T00:35:09+5:302015-07-16T00:35:09+5:30

जुलै महिन्यात मुंबईसह गुजरातवर मान्सूनचा दुसरा प्रवाह कार्यान्वित झालेला नसल्याने संपूर्ण राज्यातून पाऊस गायब झाल्याची माहिती स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट या हवामानविषयक संस्थेचे

Waiting for the monsoon to become active | मान्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षा

मान्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षा

Next

मुंबई : जुलै महिन्यात मुंबईसह गुजरातवर मान्सूनचा दुसरा प्रवाह कार्यान्वित झालेला नसल्याने संपूर्ण राज्यातून पाऊस गायब झाल्याची माहिती स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट या हवामानविषयक संस्थेचे उपाध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशावर पुढील काही दिवसांत मान्सूनला पूरक वातावरण निर्माण झाले तरच महाराष्ट्रासह मुंबईत पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
शर्मा म्हणाले की जून महिन्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा मान्सूनचा पहिला प्रवाह मुंबईसह गुजरात दिशेने वर सरकला होता. परिणामी मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडला होता. जुलै महिन्यातदेखील मान्सूनचा दुसरा प्रवाह या पट्ट्यांत सक्रिय होणे अपेक्षित होते. परंतु हवामानात झालेल्या बदलाचा विपरीत परिणाम म्हणून हा प्रवाह कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे पावसाने दडी मारली आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतही पावसाने दडी मारली आहे. (प्रतिनिधी)

अंदाज काय आहे ?
१६, १७, १८ आणि १९ जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. शिवाय मुंबईतही पावसाच्या एक, दोन सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Web Title: Waiting for the monsoon to become active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.