नवीन जिल्ह्यांसाठी अहवालाची प्रतीक्षा
By admin | Published: December 12, 2015 12:19 AM2015-12-12T00:19:51+5:302015-12-12T00:19:51+5:30
जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासंदर्भात महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
नागपूर : जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासंदर्भात महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित केल्या जाणाऱ्या निकषानुसार मालेगावसह अन्य जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
जिल्हा विभाजनाबाबत समिती गठित करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी तालुका निर्मिती, विभाजनाचे निकष निश्चित करण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक अन्य समिती गठित करण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो शासनाच्या विचाराधीन आहे.
राज्यातील प्रशासकीय सोयीसाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन २२ जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी समिती गठित करण्यात आली आहे का, असा प्रश्न जनार्दन चांदूरकर, मुझफ्फर हुसैन सय्यद, संजय दत्त, अनिल परब आदींनी उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)