पावणेतीन लाख मुलींना सॅनिटरी नॅपकिनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:50 AM2018-05-30T06:50:53+5:302018-05-30T06:50:53+5:30
स्मिता योजनेसाठी नोंदणी केलेल्या राज्यातील पावणेतीन लाख शाळकरी मुलींपर्यंत अद्याप सॅनिटरी नॅपकीन पोहोचलेले नाहीत
अण्णा नवथर
अहमदनगर : अस्मिता योजनेसाठी नोंदणी केलेल्या राज्यातील पावणेतीन लाख शाळकरी मुलींपर्यंत अद्याप सॅनिटरी नॅपकीन पोहोचलेले नाहीत. ग्रामविकास खात्याने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या या योजनेला सुस्त प्रशासनामुळे खीळ बसत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत योजनेला गती देण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना सोमवारी दिले.
अस्मिता योजनेंतर्गत ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींची आॅनलाइन नोंदणी करून त्यांना योजनेचे कार्ड वाटप करण्यात येणार आहे़ त्याआधारे सॅनिटरी नॅपकीन सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुलींची नोंदणी करून त्यांना कार्ड वाटप करण्याचे काम राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत हाती घेण्यात आले आहे़ नॅपकिनसाठी २ लाख ७४ हजार ९९७ मुलींनी नोंदणी केली़ मात्र सॅनिटरी नॅपकिन अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. ११ जूनपर्यंत कामात सुधारणा करण्याचे आदेश देणारे पत्र ग्रामविकासमंत्र्यांनी दिले आहे़
जिल्हानिहाय
मुलींची नोंदणी
अहमदनगर- १२, १७२, अकोला-३,८३३, अमरावती-११,५१०, बीड-१४,७३९, भंडारदरा-६,१२३, चंद्रपूर-३,१७७, धुळे-१,९१२, गडचिरोली-१,९१२, गोंदिया-१५,२३७, हिंगोली-११८, जळगाव-५,७२३, जालना-३,५३४, कोल्हापूर-१५,०३५, लातूर-८,५८६, नागपूर-३,३३८, नांदेड-१,८३२, नंदुरबार-८५१, नाशिक-२५,२१०, उस्मानाबाद-२,२९८, पालघर-५,३६८, परभणी-८,१७२, पुणे-१४,३०५, रायगड-७,०१९, रत्नागिरी-२,३५८, सांगली-४,७४६, सातारा-८,४७३, सिंधुदुर्ग-६,३७९, सोलापूर-१८,६३१, ठाणे-३,३९१, वर्धा-४,५०६, वाशिम-३,१२३, यवतमाळ-७,७२४़