पुणे विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

By admin | Published: May 2, 2015 01:07 AM2015-05-02T01:07:05+5:302015-05-02T01:07:05+5:30

गेल्या १५ वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेले व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की

Waiting for 'takeoff' at the Pune airport | पुणे विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

पुणे विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

Next

पुणे : गेल्या १५ वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेले व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. शासनाने पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर तरी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चाकण विमानतळ सुरुवातीपासूनच वादात सापडल्याने गेल्या १५ वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय राहिला आहे. शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांतील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १९९७ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच चाकणच्या उत्तरेस पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्वे करण्यात आला. जागा देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ भाग विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचा असल्याचा अभिप्राय एमएडीसीने (महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी) दिला. त्यामुळे विमानतळासाठी पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरू झाला आणि कडूस-पाईट येथे विमानतळ करता येईल का, याबाबत विचार सुरू झाला. ही जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु याबाबतदेखील गेली दोन वर्षे काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यात राज्य शासनाने सेझसाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for 'takeoff' at the Pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.