मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेतीन हजार रुग्ण प्रतीक्षेत, अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:16 AM2017-11-27T06:16:47+5:302017-11-27T06:17:39+5:30

अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते.

 Waiting for three thousand patients for kidney transplantation, the need to remove the myocardial misconception | मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेतीन हजार रुग्ण प्रतीक्षेत, अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्याची गरज

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेतीन हजार रुग्ण प्रतीक्षेत, अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्याची गरज

Next

 - स्नेहा मोरे
मुंबई : अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते. अवयवदानाविषयी जनजागृती होऊनही सध्या मुंबईतील जवळपास ३ हजार ५०० हून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. त्यामुळे अजूनही अवयवदानाविषयी जनजागृतीसह त्याविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी २.१ लाख भारतीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, मात्र प्रत्यक्षात केवळ ३000-४000 मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीतही परिस्थिती काही वेगळी नाही. देशभरात दरवर्षी ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १00 लोकांचे हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. सध्या मुंबईत एकूण २५ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत, तर यकृत प्रत्यारोपणासाठी २६५, फुप्फुसासाठी पाच ते सहा व्यक्ती प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक ऊर्मिला महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली.
अवयवदात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुºया पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे, असे मत अवयवदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत आपटे यांनी व्यक्त केले. एका व्यक्तीने अवयवदान केले तर आठ जणांना नवसंजीवनी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दाता कार्ड ही औपचारिकता

तुमची अवयवदान करण्याची इच्छा आहे हे सांगण्यासाठी दाता कार्डवर स्वाक्षरी करणे ही पहिली पायरी आहे. दाता कार्ड हे कायदेशीर कागदपत्र नाही तर एखाद्याची अवयवदान करण्याची इच्छा दर्शविणारे ते कार्ड आहे.
मात्र अवयवदानासाठी कुटुंबातील सदस्यांची परवानगी मागितली जाते. मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये यकृत, हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड, आतडे यांसारखे महत्त्वपूर्ण अवयव आणि कॉर्निया, हृदयाचे व्हॉल्व, त्वचा, हाडे, अस्थी, शिरा, नस दान करता येते.

ज्या व्यक्तीचा मेंदू मृत पावला आहे (इ१ं्रल्ल ऊीं)ि आणि ज्याला मृत्यूनंतरचे अवयवदान म्हटले जाते, त्याचे प्रमाण भारतात अजूनही कमी आहे. स्पेनमध्ये दहा लाख लोकांमागे ३५ लोक अवयवदान करणारे आहेत. ब्रिटनमध्ये ही संख्या दहा लाख लोकांमागे २७ लोक आणि अमेरिकेत ११ लोक इतकी आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.१६ लोक इतके अत्यल्प आहे.

Web Title:  Waiting for three thousand patients for kidney transplantation, the need to remove the myocardial misconception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.