कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट पाहाताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:52 AM2018-04-24T04:52:18+5:302018-04-24T04:52:18+5:30

शरद पवार यांचा सवाल : चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी

Waiting for what to wait for? | कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट पाहाताय?

कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट पाहाताय?

Next

कोल्हापूर : कोठड्या भरण्यासाठी तुम्ही कशाची वाट पाहताय? भरा ना. आमची काही हरकत नाही. उलट तुरुंगातून जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते. एकदा जनतेतून निवडणूक लढवा म्हणजे शिकायला मिळेल, असा टोमणा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
मुंबई येथील भाजप मेळाव्यात बोलताना महसूल मंत्री पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याशेजारी आणखी दोन-तीन कोठड्या शिल्लक आहेत, असा इशारा दिला होता. त्याला शरद पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘राजकारणात शत्रू नव्हे तर विरोधक असतो; परंतु विरोधकांना साप, विंचू, कुत्रे अशा उपमा देणारे लोक आता सत्तेत आहेत. हे संसदीय लोकशाहीला न शोभणारे आहे. त्यामुळे अशा लोकांच्या हातात सत्ता जास्त काळ ठेवणे योग्य नाही. दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, असे आमचे प्रयत्न आहेत व त्याला काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही संमती दर्शविली आहे. त्यामुळे आम्ही शक्य तिथे एकत्र लढू.
१० जूनला प्रचाराचा नारळ फोडणार
राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिन १० जूनला होत आहे. त्याचदिवशी निवडणुकीच्या प्रचाराचा आम्ही नारळ फोडणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

लोकच अद्दल घडवतील...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी हुकूमशहा म्हणणार नाही; परंतु माझा अनुभव असा आहे की, लोकशाहीची चौकट मोडून कुणी कारभार करीत असतील तर त्याला अद्दल घडविण्याची ताकद या देशातील सामान्य जनतेत आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशात आणीबाणी लागू केली तेव्हा आम्हीही त्यांच्यासोबत होतो. हा निर्णय चांगला असल्याची त्यावेळी आमची भावना होती; परंतु जनतेला हा निर्णय आवडला नाही. त्यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव करून राग व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी धमकी देऊ नये
कोकणात जागा नाही दिली तर नाणार प्रकल्प गुजरातला जाईल, अशी धमकी मुख्यमंत्र्यांनी देऊ नये, असा सल्लाही पवार यांनी दिला. ते म्हणाले, ‘स्थानिक लोकांच्या संवेदना विचारात घेऊनच या प्रकल्पासंबंधी निर्णय व्हावा. हा प्रकल्प गुजरात किंवा कर्नाटकला गेला म्हणजे तो आपल्या देशातच आहे. गुजरातला गेला म्हणजे तो काय पाकिस्तानमध्ये गेला असे नव्हे, असाही टोला पवार यांनी लगावला.
 

Web Title: Waiting for what to wait for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.