वादग्रस्त जेलर जाधवविरुद्धच्या तक्रारीबद्दल पाच वर्षांनी जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:01 AM2018-05-24T00:01:39+5:302018-05-24T00:01:39+5:30

गृहविभागाकडून चौकशी समितीची स्थापना : आयपीएस अस्वती दोरजे करणार तपास

Wake up in five years after the complaint against the controversial Jailor Jadhav | वादग्रस्त जेलर जाधवविरुद्धच्या तक्रारीबद्दल पाच वर्षांनी जाग

वादग्रस्त जेलर जाधवविरुद्धच्या तक्रारीबद्दल पाच वर्षांनी जाग

Next

मुंबई : महाराष्ट्र कारागृहसेवेतील सर्वाधिक वादग्रस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाºया, निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरुद्धच्या एका तक्रारीबद्दल राज्य सरकारला तब्बल पाच वर्षांनंतर जाग आली आहे. त्याच्या वर्तणुकीबद्दल तब्बल १७ महिला अधिकाºयांनी केलेल्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीच्या चौकशीसाठी गृहविभागाने स्वतंत्र पाच जणांच्या समितीची स्थापना केली आहे. मुंबईतील सशस्त्र विभागाच्या (एलए) अपर आयुक्त अस्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
गेली जवळपास दोन वर्षे निलंबित असलेला जाधव २०१६ मध्ये येरवडा येथील दौलतराव जाधव प्रशिक्षण महाविद्यालयात प्राचार्य असताना, त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत असलेल्या १७ उपनिरीक्षक तरुणींनी त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली होती. त्याबाबत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर, गेली चार वर्षे या प्रकरणाची फाइल धूळ खात पडली होती. दरम्यानच्या काळात ठाणे कारागृहात रुजू झाल्यानंतर तेथेही महिला कर्मचाºयाशी अश्लील वर्तन केल्याने निलंबित झाले. याबाबत पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे.
दौलतराव जाधव ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना, त्याच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवर प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्यावर ५ दोषारोप ठेवले आहेत. त्याबाबत विशाखा केसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाºयांच्या होणाºया लैंगिक छळाला प्रतिबंध व त्याचे निवारण करण्यासाठी गृहविभागाने चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीने दोन महिन्यांत या प्रकरणाचा तपास करून, त्याचा अहवाल विभागाला सादर करावयाचा आहे. मात्र, जाधव यांच्याविरुद्धच्या यापूर्वीच्या तक्रारीबद्दल नेमलेल्या चौकशी अद्याप प्रलंबित आहेत. त्याला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

ट्रेनिंग कॉलेजमधील प्रकरण
हिरालाल जाधव हे २०१६मध्ये येरवड्यातील कारागृहाच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना, तेथे प्रशिक्षणासाठी आलेल्या उपनिरीक्षक तरुणींशी अश्लील वर्तन करीत होता. त्यांच्या छळाला कंटाळून १७ जणींनी एकत्रितपणे वरिष्ठांकडे तक्रार दिल्याने मोठी खळबळ उडाली होती.
त्याबाबत तुरुंग विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी प्राथमिक चौकशी करून, ६ डिसेंबर २०१३ मध्ये अहवाल दिला होता. त्यानंतर, जाधव यांचे निलंबन झाले. मात्र, विभागीय चौकशी मुदतीत पूर्ण न झाल्याने, सुमारे दीड वर्षाने ठाणे कारागृहात अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्या ठिकाणीही तोच कित्ता गिरवल्याने आॅगस्ट २०१६ मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आले.

कोण आहे चौकशी समितीमध्ये
अपर आयुक्त अस्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सचिव येरवडा कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटवार आहेत. तर मुंबईच्या समाजसेवा विभागाचे सहायक आयुक्त अरविंद सावंत, अ‍ॅड. अनुपमा पवार, स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्या फरिदा लांबे या सदस्या आहेत.

वादग्रस्त प्रकरणे
हिरालाल जाधव यांची कारकिर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे. विशेषत: महिलांशी गैरवर्तणुकीबद्दल कोल्हापूर, औरंगाबाद, येरवडा, ठाणे या ठिकाणी काम करीत असताना तक्रारी झाल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी ठाणे मध्यवर्ती कारागृहात जेलर असताना, एका महिला कर्मचारीला २६ आॅगस्ट, २०१६ रोजी कळवा पूल येथे बोलावून शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. दुसºया दिवशी मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले होते. ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
जाधव हे ठाणे कारागृहातील काही कैद्यांकडून मोठी रक्कम घेऊन जेलमध्ये पंचतारांकित सुविधा पुरवितात, अशी तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्या प्रकरणाची चौकशी प्रलंबित आहे.
दीड वर्षांपूर्वी भायखळा महिला कारागृहात मंजुषा शेटे हिची अमानुष मारहाण करून, हत्या करून मारहाण करणाºया महिला तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकर व अन्य पाच महिला रक्षकांना वाचविण्यासाठी उपमहानिरीक्षक स्वाती साठे या प्रयत्नशील आहेत, असा आरोप जाधव यांनी केला होता. त्याबाबतचा व्हॉट्सअप मॅसेज व्हायरल झाला होता.

Web Title: Wake up in five years after the complaint against the controversial Jailor Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.