कल्याण स्थानकाच्या भिंती नटल्या चित्रांनी
By Admin | Published: April 26, 2016 09:01 AM2016-04-26T09:01:06+5:302016-04-26T10:20:00+5:30
मध्य रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक असलेल्या 'कल्याण' स्टेशनचा कायापालट झाला असून स्थानकांच्या भितींवर सुदर चित्र रंगवण्यात आली आहेत.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि.२६ - मध्य रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक असलेल्या 'कल्याण' स्टेशनचा कायापालट झाला आहे. कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कल्याण शहरातील महत्वपूर्ण ठिकाणांची सुंदर चित्र रंगवण्यात आली आहेत.
'कल्याण मेरी शान ' अशा सुंदर अक्षरात रंगवलेल्या चित्रासह काळा तलाव, खिडकी वडापाव, दुर्गाडी किल्ला व देवीचे मंदिर, कल्याणचे वैशिष्ट्य असलेला टांगा अशी अनेक चित्र या भिंतीवर रंगवण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर डोंबिवली स्थानकाच्या धर्तीवर कल्याण स्थानकातील ब्रिजही चकाचक झाला असून ब्रिजच्या पाय-याही रंगवण्यात आल्या आहेत तसेच त्यावर अनेक चांगले संदेशही लिहीण्यात आले आहेत.
स्थानकाच्या या कायापालटामुळे कल्याणकरांना सुखद धक्का बसला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे फोटो शेअर होत आहेत. यापूर्वी पालघर, डोंबिवली, विलेपार्ले या स्थानकांचेही सुशोभीकरण करून तेथेही सुंदर चित्रे रेखाटण्यात आली होती.