वॉलमार्ट राज्यात करणार ९०० कोटींची गुंतवणूक

By Admin | Published: July 13, 2017 05:09 AM2017-07-13T05:09:21+5:302017-07-13T05:09:21+5:30

प्रख्यात अमेरिकन कंपनी वॉलमार्ट आता महाराष्ट्रात मॉल्सचे जाळे उभारणार

Walmart to invest 900 crores in the state | वॉलमार्ट राज्यात करणार ९०० कोटींची गुंतवणूक

वॉलमार्ट राज्यात करणार ९०० कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रख्यात अमेरिकन कंपनी वॉलमार्ट आता महाराष्ट्रात मॉल्सचे जाळे उभारणार असून त्या संदर्भातील करार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वॉलमार्ट १५ ठिकाणी मॉडर्न होलसेल कॅश अँड कॅरी स्टोअर्स उभारणार आहे. त्याद्वारे ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
एकूण ३० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. त्यात प्रामुख्याने महिला, स्थानिक बचत गट यांचा समावेश असेल. मेक इन इंडियांतर्गत ‘इझ आॅफ डुर्इंग बिझनेस’साठी शासनाने शासनाने किरकोळ व्यापार धोरण ११ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केले होते. त्या अंतर्गत वॉलमार्टच्या मॉल्सची उभारणी करण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सुलभ केली जाणार आहे. कंपनीला आवश्यक असलेल्या परवानग्या विहित वेळेत दिल्या जातील. आजच्या करारप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, वॉलमार्ट इंडियाचे अध्यक्ष क्रिश अय्यर उपस्थित होते.
महिला कौशल्य विकासासाठी शासन-गोदरेजमध्ये करार
गोदरेज कंपनी आता कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) यांच्याबरोबर एकत्र येऊन महिला सक्षमीकरणात महत्त्वाचा सहभाग नोंदवेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासनाचा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, गोदरेज अ‍ॅण्ड बॉयस आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्यात सांमजस्य करार झाला. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आयुक्त ई. रवींद्रन, गोदरेज कंपनीचे फिरोजा गोदरेज, न्यारिका होळकर, अनुप मॅथ्यू, सीमा तिवारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सामंजस्य करारानुसार महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. हा करार सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) भाग आहे. हा करार हा एक वषार्साठी असून त्यानुसार दोन हजार महिलांचे उद्योग व्यवसायासाठी सक्षमीकरण करण्यात येईल. निलंगेकर म्हणाले की, मेक इन इंडियानंतर कौशल्य विकासासाठी झालेला हा ६२ वा करार आहे.
मॅनग्रोव्हन अ‍ॅपचे उद्घाटन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मॅनग्रोव्हन अ‍ॅपचा प्रारंभ झाला. या अ‍ॅपमध्ये खारफुटीचे संरक्षण संवर्धन कसे करावे, याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Walmart to invest 900 crores in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.