वानखेडेंची ‘त्या’ व्हिडीओविरुद्ध पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:33 IST2023-08-03T14:32:20+5:302023-08-03T14:33:12+5:30
वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी कॉर्डिलिया क्रूझ केस या मथळ्याखाली एक बातमी व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला. ज्यात आरोपी तिरोडकर याने खासगी मराठी यूट्यूब चॅनेल आणि इतर माध्यमांवर तथ्यांची पडताळणी न करता तो अपलोड केल्याने माझी बदनामी झाल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.

वानखेडेंची ‘त्या’ व्हिडीओविरुद्ध पोलिसांत धाव
मुंबई : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्याविरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात तिरोडकर यांची खोटी आणि बदनामी करणारी एक मुलाखत मराठी वृत्त वाहिनी तसेच इतर माध्यमांवर प्रकाशित केल्याचा दावा वानखेडेंनी केला आहे. त्यानुसार काही पुरावेदेखील त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. अंबोली पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी कॉर्डिलिया क्रूझ केस या मथळ्याखाली एक बातमी व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला. ज्यात आरोपी तिरोडकर याने खासगी मराठी यूट्यूब चॅनेल आणि इतर माध्यमांवर तथ्यांची पडताळणी न करता तो अपलोड केल्याने माझी बदनामी झाल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरण आणि त्या प्रकरणाच्या तपासात कसूर केल्याबाबतचे, तसेच भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यात कोर्टाने अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत.