शपथविधीसाठी वानखेडेची चाचपणी

By admin | Published: October 24, 2014 04:22 AM2014-10-24T04:22:53+5:302014-10-24T04:22:53+5:30

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आता मंत्रिमंडळ स्थापनेच्या प्रक्रियेसाठी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे

Wankhede's checkup for swearing | शपथविधीसाठी वानखेडेची चाचपणी

शपथविधीसाठी वानखेडेची चाचपणी

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आता मंत्रिमंडळ स्थापनेच्या प्रक्रियेसाठी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपप्रणित मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी गुरुवारी मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमची पाहणी करण्यात आल्याचे सूूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत अधिकृत पत्रव्यवहार झाला नसल्याचे स्टेडियम प्रशासनाने सांगितले आहे.
मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी स्टेडियमची पाहणी करण्यासाठी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी गुरुवारी वानखेडे स्टेडियमला भेट दिल्याचे स्टेडियम प्रशासनाने सांगितले. या माहितीनुसार, ‘स्टेडियममध्ये ३३ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था आहे. तसेच जास्तीत जास्त ३५ हजार लोकांना सामावून घेण्याची स्टेडियमची क्षमता आहे.’ नव्या सरकारच्या शपथविधीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीची शक्यता आहे. भाजपा ३५ हजारांहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वानखेडेनंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा पर्याय भाजपासमोर खुला असल्याचे समजते.

Web Title: Wankhede's checkup for swearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.