"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 06:50 PM2024-11-10T18:50:56+5:302024-11-10T18:52:32+5:30

Pankaja Munde News: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही, असे विधान त्यांनी केले.

"Wanted to go higher, but didn't get the chance"; Pankaja Munde's defeat in the Lok Sabha | "उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल

"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल

Pankaja Munde: "मला खासदार व्हायचं होतं, पण आमदार झाले. महाराष्ट्राला मला काही केंद्रात जाऊ द्यायचं नव्हतं", अशी खंत पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचारसभेत व्यक्त केली. 

"मला बीड जिल्हा राजकारणाच मैदान वाटत नाही. मी गेलेल्या गोष्टीचा विचार कधी करत नाही. पावणे सात लाख मते मला लोकांनी दिली. उंचीवर जायचं होतं, ती संधी मिळाली नाही. तुमचं, माझं आणि जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे", असे पंकजा मुंडे प्रचारसभेत बोलताना म्हणाल्या. 

"खोटे गुन्हे दाखल केले नाहीत, कधी त्रास दिला नाही. लोकसभेमध्ये कारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली. तोंडावर एक, माघारी एक, पोटात एक, ओठात एक असा माझा स्वभाव नाही. आष्टीमध्ये वेगळी परिस्थिती आहे. मी आमच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार आहे. तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या प्रचाराला जा", असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

 पंकजा मुंडे या प्रचारसभेत बोलताना म्हणाल्या की, "मला कधीच वाटलं नाही की, मला घड्याळाचा प्रचार करावा लागेल. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. संपूर्ण पक्ष घेऊन तुकडा घेऊन नवीन सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. लोकांनी महायुतीला स्वीकारले आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी योगदान आहे", असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

"दर महिन्याला पंधराशे रुपये ओवाळणी घातल आहेत. मोदीजी सरकारमध्ये आले आहेत, महायुतीचा मुख्यमंत्री देण्यासाठी महायुतीचा आमदार द्यावा लागेल. तो आमदार महायुतीची शक्ती वाढवण्याचे काम करेल", असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

Web Title: "Wanted to go higher, but didn't get the chance"; Pankaja Munde's defeat in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.