खड्डेमुक्तीसाठी मंत्रालयात वॉर रूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:18 AM2017-11-08T05:18:39+5:302017-11-08T05:18:44+5:30
राज्यातील सर्व राज्य महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून या कामावर लक्ष देण्यासाठी थेट मंत्रालयातच वॉर रुम उघडण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील सर्व राज्य महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून या कामावर लक्ष देण्यासाठी थेट मंत्रालयातच वॉर रुम उघडण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वॉर रुममध्ये पत्रकारांना सांगितले की, संपूर्ण राज्यातील खड्डे मुक्तीसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीची निविदा काढण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक १० किमी रस्त्याची कामे २ वर्षे कालावधीसाठी संबंधित कंत्राटदारास देण्यात येणार आहेत. या कालावधीत या रस्त्याची जबाबदारी त्या कंत्राटदाराची असेल.
राज्यात होणाºया कामांची माहिती आॅनलाईन जिल्हा निहाय तसेच विभाग निहाय या वॉर रूममध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोजच्या रोज घेतला जाणार आहे. यामध्ये केलेल्या कामाबरोबरच त्याची छायाचित्रे ही अपलोड होत आहेत. त्यामुळे खड्डे भरताना आणि भरल्यानंतरची स्थिती ही ही माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे.