वॉर्ड : एच/ईस्ट - वर्चस्वासाठी सर्वस्व पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 09:53 PM2017-01-30T21:53:07+5:302017-01-30T21:53:07+5:30

मुंबईच्या उपनगर जिल्हयातील एच/ईस्ट या वॉर्डलाही नव्या प्रभाग रचनेचा फटका बसला आहे. २०१२ साली पार पडलेल्या महापालिका निवडणूकीवेळी या वॉर्डमध्ये एकूण अकरा प्रभाग होते

Ward: H / East - Everything for Varchaswa | वॉर्ड : एच/ईस्ट - वर्चस्वासाठी सर्वस्व पणाला

वॉर्ड : एच/ईस्ट - वर्चस्वासाठी सर्वस्व पणाला

Next

मुंबई : मुंबईच्या उपनगर जिल्हयातील एच/ईस्ट या वॉर्डलाही नव्या प्रभाग रचनेचा फटका बसला आहे. २०१२ साली पार पडलेल्या महापालिका निवडणूकीवेळी या वॉर्डमध्ये एकूण अकरा प्रभाग होते. मात्र आता नव्या प्रभाग रचनेनुसार येथील एक प्रभाग कमी झाला असून, येथील एकूण प्रभागांची संख्या दहावर आली आहे. गत निवडणूकीत येथे सेनेला बहुमत प्राप्त झाले असून, येथे सेनेचे एकूण चार नगरसेवक विजयी झाले होते. त्या खालोखाल काँग्रेसचे तीन, मनसेचे दोन, भाजपाचा एक आणि अपक्ष एक नगरसेवक विजयी झाले होते. परिणामी आता सेनेला येथे वर्चस्व टिकवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

एच/ईस्ट या वॉर्डमध्ये हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस ३, सेन नगर, व्ही.एन.देसाई रुग्णालय, आग्रीपाडा, वाकोला, डवरीनगर, प्रतिक्षानगर, शिवाजीनगर, लालबहादुर शास्रीनगर, गाला कॉलेज, धोबी घाट, कलिना, पी अ‍ॅँड टी कॉलनी, कोर्वेनगर, आय.ए.स्टा कॉर्टर्स, विद्यानगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंत नगर, पोलीस प्रशिक्षण मैदान, एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी, ज्ञानेश्वर नगर, भारत नगर, गव्हर्नमेंट कॉलनी, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधीनगर, गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहर नगर, खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, निर्मल नगर, वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरिब नगर, वांद्रे कोर्ट या परिसरांचा समावेश होतो.

येथील पक्षीय बलाबल पाहता वॉर्डात प्रथमदर्शनी सेनेचे प्राबल्य निदर्शनास येत असले तरी लोकसभा आणि विधानसभेला आलेली भाजपाची लाट लक्षात घेता भाजपाने महापालिका निवडणूकीसाठी येथे ‘फिल्डींग’ लावली आहे. शिवाय मनसे, सपा आणि आपसारखे पक्षही कार्यान्वित झाल्याने येथे सेनेला आपली राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. दुसरीकडे युती आणि आघाडीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने राजकीय पक्षाच्या दावेदारांसह उत्सुक उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर दिला आहे. एकंदर महापालिका निवडणूकीची जोरदार रणधूमाळी सुरु झाली असून, त्याच अनुषंगाने विकासकामेही उरकण्यावर या वॉर्डात भर देण्यात येत आहे.

.........................................

प्रभाग क्रमांक ८७

आरक्षण खुला

एकूण लोकसंख्या ५७३१५

अनुसूचित जाती १३५५

अनुसूचित जमाती १६६

प्रभागाची व्याप्ती : हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस ३, सेन नगर, व्ही.एन.देसाई रुग्णालय

.........................................

प्रभाग क्रमांक ८८

आरक्षण खुला

एकूण लोकसंख्या ५१७३६

अनुसूचित जाती ८६९

अनुसूचित जमाती २८९

प्रभागाची व्याप्ती : आग्रीपाडा, वाकोला, डवरीनगर, प्रतिक्षानगर, शिवाजीनगर

.........................................

प्रभाग क्रमांक ८९

आरक्षण इतर मागासवर्गीय

एकूण लोकसंख्या ६०८८८

अनुसूचित जाती ३५१६

अनुसूचित जमाती ३९७

प्रभागाची व्याप्ती : लालबहादुर शास्रीनगर, गाला कॉलेज, धोबी घाट

.........................................

प्रभाग क्रमांक ९०

आरक्षण इतर मागसवर्गीय (महिला)

एकूण लोकसंख्या ५६४६८

अनुसूचित जाती ३१६२

अनुसूचित जमाती ४५२

प्रभागाची व्याप्ती : कलिना, पी अ‍ॅँड टी कॉलनी, कोर्वेनगर, आय.ए.स्टा कॉर्टर्स

.........................................

प्रभाग क्रमांक ९१

आरक्षण इतर मागसवर्गीय

एकूण लोकसंख्या ५५४२८

अनुसूचित जाती २२९५

अनुसूचित जमाती ४८७

प्रभागाची व्याप्ती : विद्यानगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंत नगर, पोलीस प्रशिक्षण मैदान

.........................................

प्रभाग क्रमांक ९२

आरक्षण खुला (महिला)

एकूण लोकसंख्या ५२९५१

अनुसूचित जाती २४०५

अनुसूचित जमाती ४३४

प्रभागाची व्याप्ती : एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी, ज्ञानेश्वर नगर, भारत नगर

.........................................

प्रभाग क्रमांक ९३

आरक्षण अनुसूचित जाती (महिला)

एकूण लोकसंख्या ५८०१४

अनुसूचित जाती १०४६२

अनुसूचित जमाती ८९७

प्रभागाची व्याप्ती : गव्हर्नमेंट कॉलनी, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधीनगर

.........................................

प्रभाग क्रमांक ९४

आरक्षण खुला (महिला)

एकूण लोकसंख्या ५९९९८

अनुसूचित जाती २०३०

अनुसूचित जमाती ४१६

प्रभागाची व्याप्ती : गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहर नगर

.........................................

प्रभाग क्रमांक ९५

आरक्षण खुला

एकूण लोकसंख्या ४९८०५

अनुसूचित जाती ६८९०

अनुसूचित जमाती ५०५

प्रभागाची व्याप्ती : खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, निर्मल नगर

.........................................

प्रभाग क्रमांक ९६

आरक्षण खुला

एकूण लोकसंख्या ५४६३६

अनुसूचित जाती १५११

अनुसूचित जमाती १३७

प्रभागाची व्याप्ती : वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरिब नगर, वांद्रे कोर्ट

.........................................

२०१२ साली के/ईस्ट वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवार

वॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते

८१स्नेहल शिंदे, मनसे७७१६शीतल सुतार, काँग्रेस५४०१

८२सुखदा पवार, मनसे९७५०हर्षदा परब, सेना८९४९

८३सुनैना पोतनीस, सेना८२६१भाग्यश्री मोरे, मनसे६७५४

८४ब्रायन मिरिंडा, काँगेस३८७४शशीकांत सांवत, मनसे२७०७

८५एलियाझ शेख, अपक्ष३८५०शंकला युनूस, काँग्रेस३३९२

८६पूजा महाडेश्वर, सेना६६७५हेलन बर्डे, काँग्रेस५०७३

८७कृष्णा पारकर, भाजपा९१८५अब्दुल तांबोळी, एनसीपी ६८५८

८८दिपक भूतकर, सेना८६४४जाजू विवेकानंद, काँगेस५६८६

८९अनिल त्रिंबकर, सेना५८३८गणेश मांजरेकर, एनसीपी ५४२७

९०प्रियतमा सांवत, काँग्रेस६५१३बाळाबाई लोखंडे, मनसे३७६६

९१गुलिस्ता शेख, काँग्रेस४८३५यस्मिन शेख, सपा४२६७

.........................................

Web Title: Ward: H / East - Everything for Varchaswa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.