पथारी व्यावसायिकांसाठी वॉर्डनिहाय सभा
By admin | Published: July 11, 2014 11:49 PM2014-07-11T23:49:06+5:302014-07-11T23:49:06+5:30
पथारी व्यावसायिक हा काही गुन्हेगार नाही. त्यामुळे वाट्टेल ते करा; मात्र त्याच्या पोटाला हात घालू नका, अशी आर्त हाक हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी दिली.
Next
पुणो : पथारी व्यावसायिक हा काही गुन्हेगार नाही. त्यामुळे वाट्टेल ते करा; मात्र त्याच्या पोटाला हात घालू नका, अशी आर्त हाक हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी दिली. पथारी व्यवसायिकांना जनतेचा पाठिंबा मिळविण्याचे काम यापुढे करणार असून, त्यासाठी प्रसंगी वॉर्डनिहाय सभा घेण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले.
गणोश कला क्रीडा मंच येथे पथारी व्यावसायिकांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला विविध ठिकाणी होत असलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर डॉ. आढाव यांनी ही भूमिका व्यक्त केली. पालिका आयुक्त विकास देशमुख, शिवसना पक्षनेते अशोक हरणावळ, नगरसेवक शिवलाल भोसले, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरविंद सिंह, पथारी व्यवसायिक पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे या वेळी उपस्थित होते.
पथारी व्यावसायिकांवर वाहतुकीस अडथळा होतो, अस्वच्छता होते, अशा कारणांवरून पालिकेतर्फे अनेकदा कारवाई केली जाते. हातगाडीची देखभाल केली जात नसल्याने त्यांचे दुहेरी नुकसान होते. आज शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या लाखांवर गेली आहे. त्यांच्या पार्किगचा प्रश्न गंभीर आहे. मात्र, त्यांना वाहतूककोंडीस जबाबदार धरले जात नसल्याचे डॉ. आढाव म्हणाले.
पथारी संघटनांना कायद्याने हक्क मिळाला आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनीदेखील वाहतुकीला अडथळा, स्थानिकांना त्रस अथवा त्यांच्या आरोग्यास बाधा होईल, असे वर्तन न करण्याचे भान ठेवावे लागेल. ही शिस्त पाळली तर हक्कदेखील बजावता येतात. त्यामुळे
पथारी व्यावसायिकांना विरोध होऊ
नये, यासाठी जनतेचा पाठिंबा मिळविणार असल्याचे डॉ. आढाव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)