वर्धा झाला भाजपामय

By admin | Published: February 24, 2017 04:26 AM2017-02-24T04:26:52+5:302017-02-24T04:26:52+5:30

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा जिल्हा भाजपामय झाला आहे. ३१ जागांवर विजय संपादन करुन भाजपाने

Wardha was BJP's favorite | वर्धा झाला भाजपामय

वर्धा झाला भाजपामय

Next

वर्धा : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा जिल्हा भाजपामय झाला आहे. ३१ जागांवर विजय संपादन करुन भाजपाने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळविले. बसपाने दोन
जागांवर विजय मिळवून खाते उघडले, तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांपुरती मर्यादीत राहिली. शिवसेनेही दोन जागांवर विजय संपादन केला.या निवडणुकीत भाजपाचे खा. रामदास तडस, वर्धेचे आ. डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेसचे आ. रणजित कांबळे यांच्या देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला पाच जागांवरच समाधान मानावे लागले, तर
त्यांचा गृह तालुका देवळीत मात्र काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.हिंगणघाट विधानसभा मतदार संघात आ. कुणावार यांच्या नेतृत्त्वात १२ पैकी तब्बल नऊ जागांवर भाजपाला विजय मिळवून दिला. आर्वी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. अमर काळे यांना १३ पैकी केवळ तीन जागांवरच समाधान मानावे लागले. वर्धा विधानसभा मतदार संघातील १२ पैकी सहा जागांवर भाजपाला विजयी मिळवून देण्याची भूमिका आ. डॉ. भोयर यांनी बजावली. (प्रतिनिधी)

(BMC ELECTION RESULT : शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंच्या वहिनीचा विजय



वर्धा
पक्षजागा
भाजपा३१
शिवसेना0२
काँग्रेस१३
राष्ट्रवादी0२
इतर0४

Web Title: Wardha was BJP's favorite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.