वखार महामंडळ भ्रष्टाचाराचे आगर

By Admin | Published: September 29, 2015 02:52 AM2015-09-29T02:52:22+5:302015-09-29T02:52:22+5:30

राज्याचे वखार महामंडळ हे भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या सर्व कारभारांच्या चौकशीची लेखी मागणी

Warehousing Corporation Corruption Agar | वखार महामंडळ भ्रष्टाचाराचे आगर

वखार महामंडळ भ्रष्टाचाराचे आगर

googlenewsNext

शिर्डी / राहाता : राज्याचे वखार महामंडळ हे भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या सर्व कारभारांच्या चौकशीची लेखी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले़
विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. समितीचे अध्यक्ष बापूसाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राहात्याच्या नगराध्यक्षा विद्या शिंदे, आदी उपस्थित होते.
राज्यात दरवर्षी १५० मेट्रीक टन धान्याची निर्मिती होते, मात्र साठवणूक अवघी २५लाख मेट्रीक टन धान्याचीच करण्याची क्षमता राज्यातील गोडाऊनमध्ये असल्याने शेतकऱ्यांचा माल साठवणुुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत धान्य साठवणुकीसाठी गोडाऊनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या़ (प्रतिनिधी)

Web Title: Warehousing Corporation Corruption Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.