वारकऱ्यांचा ट्रक दरीत कोसळला; तीन ठार, ६0 जखमी

By Admin | Published: February 20, 2016 03:13 AM2016-02-20T03:13:27+5:302016-02-20T03:13:27+5:30

भीमाशंकरहून दर्शन घेऊन परतताना तळेघर-मंदोशी घाटात वारकरी असलेला ट्रक दरीत कोसळला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले.

Warkaris collapse in truck gurdwara; Three killed, 60 injured | वारकऱ्यांचा ट्रक दरीत कोसळला; तीन ठार, ६0 जखमी

वारकऱ्यांचा ट्रक दरीत कोसळला; तीन ठार, ६0 जखमी

googlenewsNext

तळेघर (जि. पुणे): भीमाशंकरहून दर्शन घेऊन परतताना तळेघर-मंदोशी घाटात वारकरी असलेला ट्रक दरीत कोसळला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. सर्व मृत हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर गावातील आहेत.
वाल्मिकी एकनाथ नागरगोजे (६०), लक्ष्मण वामन नागरगोजे (५५) आणि नरहरी मोडवे अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकरहून दर्शन घेऊन वारकरी या ट्रकने मंचरकडे निघाले होते. मंदोशी घाटात ट्रक आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटात कोसळला. जखमींवर घोडेगाव रुग्णालयात तर काहींवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Warkaris collapse in truck gurdwara; Three killed, 60 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.