वातावरण तापतेय; विदर्भाला गारपिटीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:48 AM2019-02-14T01:48:15+5:302019-02-14T01:48:28+5:30
थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास वेळ लागत असल्याने वातावरण तापत आहे. मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, १५ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.३, १९.६ अंश नोंदविण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते आणि त्यापूर्वीही हे तापमान २४, १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र, आता वातावरणातील बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.
...त्यामुळे वारे होतात तप्त
समुद्राहून जमिनीकडे म्हणजे मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी ११ वाजेपर्यंत स्थिर झाले, तर मुंबईचे वातावरण तापत नाही. म्हणजेच कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत नाही. मात्र, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब झाला म्हणजे दुपार झाली, तर हे वारे तप्त होतात. परिणामी, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येते.
दोन दिवस ‘ताप’दायक
गुरुवारसह शुक्रवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील.
राज्यातील शहरांचे किमान तापमान
अलिबाग २०.६
रत्नागिरी २१.४
पणजी २२.८
डहाणू २१.९
पुणे १६.७
जळगाव १७.४
कोल्हापूर १९.३
महाबळेश्वर १६.६
मालेगाव २०.४
नाशिक १६.४
सातारा १७.४
सोलापूर २०.१
उस्मानाबाद १९
औरंगाबाद १८.४
परभणी १९.५
बीड २१
अकोला १९.२
अमरावती १७
बुलडाणा २१.६
चंद्रपूर १५.४
गोंदिया १४.३
नागपूर १२
वाशीम १९
वर्धा १६.४
यवतमाळ १८.४
मुंबईतील ठिकठिकाणचे कमाल तापमान
कुलाबा ३४.२
वरळी ३२.९
माझगाव ३२.६
दादर ३१.७
वांद्रे ३२.१
सांताक्रुझ ३२.७
अंधेरी ३३.७
गोरगाव ३६.१
मालाड ३३.९
कांदिवली ३२.८
चारकोप ३४.७
आर्कुली ३५.१
बोरीवली ३६
विद्याविहार ३४
घाटकोपर ३६.२
पवई ३२.६
जोगेश्वरी ३५.१
भांडुप ३३.१
मुलुंड ३३.३
नेरुळ ३३.२
पनवेल ३३.२
(बुधवारचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये)