अपघातग्रस्त कामगारास न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:17 PM2021-09-04T19:17:06+5:302021-09-04T19:17:48+5:30
नितिन पंडीत भिवंडी : कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन बोटे गमावलेल्या कामगाराकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष ...
नितिन पंडीत
भिवंडी: कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन बोटे गमावलेल्या कामगाराकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या कामगाराची दखल सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने घेतली असून कामगाराच्या न्याय हक्कासाठी संस्थेने आता पुढाकार घेतला असून अपघातग्रस्त कामगाराला कंपनीने न्याय न दिल्यास कंपनी विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव अभिलाष डावरे यांनी कंपनीस दिला असून त्यासंदर्भातील लेखील निवेदन देखील डावरे यांनी पडघा पोलीस ठाण्यात दिले आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत अलाईन रिटेल ट्रेंड प्रा लिमी ही कंपनी असून या कंपनीत अशोक मोहिते हे मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन कामगारांची बोटे मशीन मध्ये तुटून निकामी झाली . या अपघाता नंतर कंपनीने कामगारा वर डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले परंतु या अपघाताची नोंद कोठे ही न केल्याने सुमारे एक महिन्याने कामगारास कामा वर हजर करून घेतले , परंतु त्यास आर्थिक नुकसान भरपाई न देऊन कामगारा वर अन्याय केला आहे .या बाबत सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव अभिलाष डावरे यांनी कंपनी कडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून कामगारास नुकसान भरपाई व कायम स्वरूपी कामावर घ्यावे अशी मागणी केली परंतु कंपनी प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कामगारां मध्ये असंतोष असून त्या विरोधात संस्थे द्वारा येत्या आठ दिवसात कंपनीने नुकसानभरपाई बाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेने दिला आहे . याबाबत लेखी निवेदन पडघा पोलीस व ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे .