विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबई ढगाळ राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:17 AM2020-05-21T05:17:01+5:302020-05-21T05:17:22+5:30
मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २८ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबई : राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असतानाच आता २१ ते २४ मे या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर, मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २८ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद होत आहे. पाऊस पडत असतानाच कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. अवकाळी पाऊस, कमाल तापमानाचे चटके, असे दुहेरी वातावरण आहे. अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास अडथळ्याविना होत असून, २८ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.