पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:24 PM2020-07-07T20:24:47+5:302020-07-07T20:26:59+5:30

मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

Warning of heavy rain in Konkan, rain in Ratnagiri throughout the day | पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस

पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस

Next
ठळक मुद्देपुण्यात मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता

पुणे : गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र अद्यापही कायम असल्याने पश्चिम किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुढील तीन दिवस कोकणातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची कोकणासह शक्यता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील माथेरान ९०, जव्हार, सुधागड पाली ८०, बेलापूर, कर्जत, खालापूर, रोहा, तलासरी ७०, अलिबाग,पालघर, विक्रमगड, वाडा ६०, भिरा, कल्याण, कणकवली, पनवेल, पोलादपूर,सावंतवाडी, वैभववाडी, वसई ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबर अनेकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला होता.

मध्य महाराष्टात महाबळेश्वर १२०, इगतपुरी ११०, वेल्हे ९०, गगनबावडा, राधानगरी ८०, जावळी मेधा ५०, आजरा, हर्सुल, पेठ, त्र्यंबकेश्वर ४०,चंदगड, ओझर, ओझरखेडा, पन्हाळा, शाहूवाडी, वडगाव मावळ, ३० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात कोरडे हवामान होते. विदर्भात गोंदिया, गोरेगाव, मोहाडी, रामटेक ५०, सालेकसा ४०, आष्ट्री,भामरागड, धानोरा, खरंगा, सडक अर्जुनी, तिरोरा, वरुड ३० मिमी पाऊस झाला होता.
घाटमाथ्यावरील लोणावळा (टाटा) १८०, अम्बोणे १५०, वळवण १००, शिरगाव, खोपोली, धरावी ७०, दावडी, डुंगरवाडी ६०, ठाकूरवाडी, वाणगाव, भिरा येथे ५०मिमी पावसाची नोंद झाली होती.

८ ते ११ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९, १० व ११ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीजिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ जुलै रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातहलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस
मंगळवारी दिवसभर तब्बल १३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई ४९, सांताक्रुझ ४५, अलिबाग ५८, पणजी २९, डहाणु १६, महाबळेश्वर ३५, पुणे १०,लोहगाव ९, कोल्हापूर ३, नाशिक ५, सातारा ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Warning of heavy rain in Konkan, rain in Ratnagiri throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.