कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:11 AM2022-07-02T10:11:33+5:302022-07-02T10:12:40+5:30
२४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असून, ५ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढणारा पाऊस राज्यभरातही सक्रिय झाला असून, शनिवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत पाऊस पडणार
२, ३ आणि ४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना.
२४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असून, ५ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.