अवकाळी पावसाचा इशारा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 02:12 PM2022-04-22T14:12:25+5:302022-04-22T14:12:54+5:30
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे होते.
मुंबई : देशभरात हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबईसह महाराष्ट्रालादेखील हवामान बदलाचा फटका बसला आहे. मुंबईत गुरुवारी सकाळी तुरळक ठिकाणी पावसाची किंचित नोंद झाली असतानाच २२ ते २५ एप्रिल दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे होते.
असा आहे अंदाज
२२ आणि २३ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
२४ आणि २५ एप्रिल : दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.