वाशिम - जिल्हाधिका-यांनी केला अवयवदानाचा संकल्प!
By admin | Published: September 3, 2016 02:42 PM2016-09-03T14:42:56+5:302016-09-03T14:42:56+5:30
राज्यभरात सध्या महाअवयवदान अभियानाची जोरासोरात अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरून नागरिकांमध्ये याप्रती प्रभावीरित्या जनजागृती केली जात आहे
Next
>- सुनील काकडे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३ - राज्यभरात सध्या महाअवयवदान अभियानाची जोरासोरात अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरून नागरिकांमध्ये याप्रती प्रभावीरित्या जनजागृती केली जात आहे. दरम्यान, नागरिकांना अवयवदानाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अवयवदानाचा संकल्प करून तसे संमतीपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सुपूर्द केले.
मृत्यूनंतर या शरिराची केवळ राखच होणार आहे. मात्र, मरणोपरांत अवयवदानाची प्रक्रिया पार पडल्यास अनेक गंभीर व्याधींनी त्रस्त तथा मरणाला टेकलेल्या रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यशासनाने महाअवयवदान हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले. त्याची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंबंधी पार पडलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सर्वप्रथम अवयवदानाचा संकल्प करून यासंदर्भात आवश्यक असलेले संमतीपत्र भरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसीरूद्दीन पटेल यांच्याकडे सुपूर्द केले. समाजात वावरणाºया नागरिकांनीही या अभियानाचा स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अवयवदान अभियानात जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या या पुढाकाराचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.