Maharashtra Politics: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार! कोर्टाने पोलिसांना दिले महत्त्वाचे निर्देश, नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 20:18 IST2022-11-15T20:16:41+5:302022-11-15T20:18:29+5:30
Maharashtra News: समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीसंदर्भात कोर्टाने पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले असून, नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार! कोर्टाने पोलिसांना दिले महत्त्वाचे निर्देश, नेमके प्रकरण काय?
Maharashtra Politics: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. सेशन कोर्टाने एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांनी वाशिम सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी वाशिम सेशन कोर्टाने नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
नवाब मलिकांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाली
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बनाव रचला होता, असा आरोप करत नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले होते. समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. तसेच नवाब मलिकांनी जातीसंदर्भात कादगपत्रे समोर आणत समीर वानखेडेंनी खोटी कागदपत्रे सादर केली आणि सरकारी नोकरी मिळवली, असा गंभीर आरोप केला होता. नवाब मलिकांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांनी याचिका दाखल केली होती. समीर वानखेडे यांच्या तक्रारीनुसार वाशिम सेशन कोर्टाने वाशिम पोलिसांना नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"