वाशिम - पंचायत समितीतील गैरहजर कर्मचा-यांची ‘बिनपगारी’
By admin | Published: August 29, 2016 04:33 PM2016-08-29T16:33:52+5:302016-08-29T16:33:52+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.
Next
>- नंदकिशोर नारे
वाशिम, दि.29 - येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान स्टिंग आॅपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या खाली आढळून आल्या होत्या या वृत्ताची दखल पंचायत समिती गटविकास अधिकारी बचुटे यांनी घेतली असून गैरहजर असणा-या कर्मचा-यांची त्या दिवसाची बिनपगारी करण्यात येणार आहे.
वाशिम पंचायत समितीमधील अनेक अधिकारी कर्मचारी अकोल्यासह बाहेरगावाहून येणे जाणे करीत असलयने त्यांना काार्यलयात पोहचण्यासाठी उशिर होतो तर कधी रेल्वे, बसची वेळ झाल्याने लवकर निघून जातात. यामुळे येथे येणा-या नागरिकांना, लाभार्थ्यंाना अधिकारी व कर्मचा-यांसाठी ताटकळत बसावे लागते. या संदर्भात लोकमतकडे अनेकांनी माहिती पुरविल्याने २६ आॅगस्ट रोजी स्टिंग आॅपरेशन केले असता सर्व कार्यालयचं खाली आढळून आले होते. त्यादिवशी स्वच्छ भारत मिशन, मुख्य कार्यकारी अधिकारी व नियामक मंडळाची मिटींगला काही अधिकारी गेले होते परंतु इतर अधिकारी, कर्मचारी कुठे गेले होते असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास बचुटे यांनी सोमवारी सभा घेवून या प्रकाराची चौकशी केली. तसेच या दिवशी जे कर्मचारी विना परवानगी गैरहजर आढळतील अशांची बिनपगारी करण्याच्या सूचना संबधितांकडे दिल्यात. तसेच कर्तव्यावर असतांना जे कर्मचारी जागेवर नव्हते व काही कारण नसतांना बाहेर गेले होते अशा कर्मचा-यांमध्ये कारवाईची भिती निर्माण झाली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशी नंतर सदरचा अहवाल वरिष्ठ अधिका-यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी बचुटे यांनी दिली.