Washim ZP Election Results: वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; वंचितला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:59 PM2021-10-06T15:59:29+5:302021-10-06T16:00:08+5:30
काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 'होमग्राऊंड'मध्ये 'जनविकास'
वाशिम : वाशिमजिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांतील पोटनिवडणुकीचा निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहिर झाला असून, जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं (१४ जागा) बाजी मारली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागा कमी झाल्या तर काँग्रेसच्या एका जागेत वाढ झाली.
जिल्हा परिषदेच्या १४ गटांत ६९ व पंचायत समितीच्या २७ गणांत १२४ उमेदवार नशिब आजमावत होते. ६ ऑक्टोबरला मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनं पाच जागा पटकाविल्या. यामध्ये तत्कालीन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तत्कालीन सभापती शोभा गावंडे यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागा कमी झाल्या असून, त्यांना दोन जागेवर विजय मिळाला. काँग्रेसने एकमेव दाभा गटाची जागा गमावली असली तरी प्रतिष्ठेच्या काटा व कवठा गटात दणदणीत विजय मिळविला. सेनेचे तत्कालीन जि.प. सभापती विजय खानझोडे यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे सेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी विजय मिळविल्याने पोटनिवडणुकीत सेनेचे नुकसान वा फायदा झाला नाही.
भाजपाने दोन्ही जागा कायम राखल्या, तर जनविकास आघाडीला कवठ्याची एक प्रतिष्ठेची जागा गमवावी लागली. अपक्ष उमेदवाराने एक जागा कायम राखली. या पोटनिवडणुकीत भर जहॉगीर, कवठा, काटा, दाभा व उकळीपेन गटात परिवर्तन घडून आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या होमग्राऊंडमध्ये जनविकास आघाडीच्या पूजा भूतेकर यांनी विजय मिळविला.
वाशिम जिल्हा परिषद
एकूण जागा १४
निकाल जाहिर १४
(विजयी उमेदवार/पक्ष)
१)आसेगाव सर्कल : चंद्रकांत ठाकरे (राकाँ )
२) कंझरा सर्कल - सुनिता कोठाळे (राकाँ)
३) दाभा सर्कल - राजेश राठोड ( राकाँ)
४) काटा सर्कल - संध्याताई विरेंद्र देशमुख (काँग्रेस)
५) पार्डी टकमोर - सरस्वती चौधरी (अपक्ष)
६) उकळीपेन - सुरेश मापारी (सेना)
७) कवठा सर्कल - वैभव सरनाईक (काँग्रेस)
८) गोभणी - पूजा भुतेकर, (जनविकास)
९) भर जहागीर - अमित बाबाराव खडसे (राकाँ)
१०) कुपटा - उमेश ठाकरे (भाजपा)
११) तळप बु. सर्कल - शोभा गावंडे (राकॉं)
१२) फुलउमरी - सुरेखा चव्हाण, (भाजपा)
१३) पांगरी नवघरे सर्कल -
लक्ष्मी सुनील लहाने ( वंचित आघाडी)
१४) भामदेवी सर्कल :
वैशाली प्रमोद लळे (वंचित आघाडी)
पोटनिवडणूक झालेल्या १४ गटातील पक्षीय बलाबल
पक्ष आता २०२० मध्ये
राकाँ ०५ ०३
काँग्रेस ०२ ०१
सेना ०१ ०१
भाजपा ०२ ०२
वंचित ०२ ०४
जनविकास ०१ ०२
अपक्ष ०१ ०१
जि.प.पक्षीय बलाबल
(एकूण जागा : ५२)
पक्ष आता २०२०
राकाँ १४ १२
काँग्रेस ११ ०९
वंचित ०६ ०८
जनविकास ०६ ०७
भाजपा ०७ ०७
शिवसेना ०६ o६
स्वाभिमानी ०१ ०१
अपक्ष ०१ ०२