वाशिमच्या बालकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By admin | Published: May 18, 2017 12:52 AM2017-05-18T00:52:17+5:302017-05-18T00:52:17+5:30
अकोला : वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
अकोला : वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार आहे. सामान्यत: २४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात या आजाराचा विषाणू तग धरत नसल्याच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु विदर्भातील तापमान ४५ अंशांच्या घरात गेले असतानाही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील एका १२ वर्षीय बालकास स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर अकोल्यातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे स्रॉब घेऊन परीक्षण केले असता, त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवार, १६ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.
अकोल्यातील रुग्णाची प्रकृती स्थिर
अकोला येथील डाबकी रोड भागातील एका इसमास स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले होते. सदर इसमास खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.