Corona Vaccination: कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण पुण्यात अधिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:01 AM2021-08-11T08:01:08+5:302021-08-11T08:01:29+5:30
कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. लस काही प्रमाणात वाया जात असली तरी ही फार चिंताजनक स्थिती नसून, एकूणच महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण नगण्यच आहे. अनेक जिल्ह्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण वजामध्ये (मायनस) आहे. कारण लसीच्या एका वायल्समध्ये १० ऐवजी ११ ते १३ डोस आले. परिणामी, अनेक जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण होत आहे.
लसींचे ‘वेस्टेज मायनस’ म्हणजे काय?
एका वायलमधून दहा जणांना डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही वायल्समधून ११, १२ तर कधी १३ जणांचे लसीकरण होते.
कारण वायल्समध्ये जास्त लस येते. तेव्हा ही संख्या लसीच्या वेस्टेजमध्ये वजा (मायनस) म्हणून पकडली जाते. केरळमध्ये ही संख्या मायनसमध्येच आहे.
वाया जाणाऱ्या लसी
जिल्हा कोव्हॅक्सिन कोविशिल्ड
(टक्के) (टक्के)
पुणे २.८३ १.५८
कोल्हापूर २.२३ -२.५१
सोलापूर ०.२३ -०.६
सातारा १.२२ -३.७८
गडचिरोली ०.४६ -२.८६
उस्मानाबाद ०.९९ -०.९४
परभणी १.३८ -०.१५
ठाणे ०.६९ -२.५५
पालघर ०.०४ -७.०६
मुंबई १.३२ -७.६२
जालना ०.९५ -०.८३
औरंगाबाद ०.७४ -०.०२
नांदेड -०.३३ ०.०६
वाशिम -१.६७ ०.२८
अकोला -५.०७ -४.८७
नागपूर -१.९४ -१.११
अमरावती -२.२९ -३.६
बुलडाणा -१.३६ -२.१९
यवतमाळ -१.५६ -३.०६
भंडारदरा -२.०४ -०.२५
रत्नागिरी -०.०३ -२.७९
सांगली -२.९७ -२.५४
सिंधुदुर्ग -०.८८ -६.७४
वर्धा -१.६५ -३.९७
चंद्रपूर -१.५४ -४.२६
लातूर -०.४१ -०.६५
बीड -१.६२ -२.१७
हिंगोली -१.०६ -१.२४
नंदुरबार -३.३६ -२.८६
धुळे -१.१९ -१.५८
नाशिक -१.५८ -१.०९
जळगाव -२.५६ -७.७५
अहमदनगर -०.७ -०.८९