ऊर्जा प्रकल्पांत वापरणार प्रक्रिया केलेले सांडपाणी

By admin | Published: April 12, 2017 10:56 PM2017-04-12T22:56:57+5:302017-04-12T22:56:57+5:30

राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा

Wastewater processed to be used in energy projects | ऊर्जा प्रकल्पांत वापरणार प्रक्रिया केलेले सांडपाणी

ऊर्जा प्रकल्पांत वापरणार प्रक्रिया केलेले सांडपाणी

Next



ऊर्जामंत्र्यांची माहिती : राज्यात सर्व ठिकाणी करणार बंधनकारक
नागपूर : राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिली. ह्यनीरीह्ण येथे आयोजित ह्यविकसनशील देशांतील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीह्ण या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ते बोलत होते.
ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत तर जास्त पाणी लागते. शेतीसाठी पुरविले जाणारे पाणी येथे जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र दुसरीकडे शहरांमध्ये लाखो लिटर सांडपाणी वाहून जाताना दिसून येते. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये होऊ शकतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पाण्याच्या कमतरतेचचा फटका राज्यातील अनेक ऊर्जा प्रकल्पांना बसला आहे. मात्र सांडपाणी वापरण्यात आले तर या प्रकल्पांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होऊ शकेल; शिवाय सांडपाण्याचा प्रश्नदेखील दूर होईल. परळी येथे नांदेडहून सांडपाणी पोहोचविणे शक्य आहे. याचप्रकारे इतर प्रकल्पांतदेखील जवळच्या शहरांतून सांडपाणी पोहोचविले जाऊ शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी कोराडी विद्युत प्रकल्पाचे उदाहरण दिले. कोराडी प्रकल्पात नागपूरच्या सांडपाण्याचा वापर करण्यात आला आहे. शिवाय जे सांडपाणी अगोदर वाया जात होते, त्यापासूनच आता नागपूर महापालिकेला १६ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Wastewater processed to be used in energy projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.