पाइप लाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
By Admin | Published: July 2, 2016 01:48 AM2016-07-02T01:48:03+5:302016-07-02T01:48:03+5:30
नगरपालिकेच्या साठवन बंधाऱ्यात अवघा १९ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असताना नगरपालिकेजवळील पाइप लाइन फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले.
लेण्याद्री : कुकडी नदीपात्र कोरडे पडल्याने नगरपालिकेच्या साठवन बंधाऱ्यात अवघा १९ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असताना नगरपालिकेजवळील पाइप लाइन फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. टाकीजवळ पाण्याचे टँकर, अग्निशामक दलातील वाहनात पाणी भरण्यासाठी एक पाइप उभा करण्यात आला आहे. तो मध्येच तुटल्याने पाणी वाया गेले. येथून याआधीही गळती सुरूहोती. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले गेले. जवळील शाळेच्या विद्यार्थ्यांनी खोडसाळपना केल्याने पाणी वाया गेले. पाणीपुरवठा विभागाने व्हॉल्व्ह बदलून गळती थांबवली.