मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी हजारो लिटर पाणी वाया
By admin | Published: May 29, 2016 09:20 AM2016-05-29T09:20:16+5:302016-05-29T09:20:16+5:30
विदर्भात एका कार्यक्रमासाठी हजर राहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रस्ते चक्क पाण्याने धूण्यात आले. त्यासाठी हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. २९ : राज्यातील जनता दुष्काळाच्या काहिलीत होरपळत असताना राज्य सरकारला मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नाही. विदर्भात एका कार्यक्रमासाठी हजर राहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रस्ते चक्क पाण्याने धूण्यात आले. त्यासाठी हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्यांतून व्यक्त करण्यात आली आहे.
विभागीय महारोजगार मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यासह व केंद्रीय राज्यमंत्री येणार असल्याने शुक्रवारी सांयकाळी उशीरा पंचवटी ते इर्विन चौक हा टँकरच्या पाण्याने धुण्यात आला या प्रकाराची चौकशी करुन कारवाईने आदेश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती व पाण्याची भीषण टंचाई असताना शुक्रवारी सायंकाळी उशिरा पंचवटी ते इर्विनपर्यंतच्या मार्गाला टँकरच्या पाण्याने धुण्यात आला. ही पाण्याची नासाडी असल्याने नागरिकांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त केला. याविषयीच तक्रार जिल्हाधिकारी करण्यात आली.
डांबरीकरणाचा मार्ग धुण्याचे आदेश कोणी दिले. याविषयी संदिग्धता आहे. विभागीय महारोजगार मेळाव्याच्या आयोजकासह महापालिकेने याविषयी हातवर केले आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपवर फिरत असलेल्या या चित्रफितीत टँकर हा डांबरीकरणाच्या मार्गावर पाणी टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणी चौकशीचे व कारवाईचे आदेश दिले आहेत.