सागरी किनाऱ्यांवर ९१ चेक पोस्टवरून वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:17 AM2018-03-29T05:17:25+5:302018-03-29T05:17:25+5:30

२६/११च्या हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व साथीदारांची सागरी मार्गे मुंबईत एन्ट्री

Watch over 91 check posts on the coastal shores | सागरी किनाऱ्यांवर ९१ चेक पोस्टवरून वॉच

सागरी किनाऱ्यांवर ९१ चेक पोस्टवरून वॉच

Next

राजेश निस्ताने 
मुंबई : २६/११च्या हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व साथीदारांची सागरी मार्गे मुंबईत एन्ट्री झाल्यानंतर पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून सागरी किनाºयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. सुरक्षेसाठी दरवर्षी नवनवीन उपाययोजना व आणखी दक्ष राहण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे.
सागरी किनाºयांच्या सुरक्षेत कोणतीही कसर राहू नये म्हणून केंद्र शासन व तटरक्षक दलाकडून सागरी पोलीस ठाण्यांना वेळोवेळी मदत केली जाते. पोलिसांना बोटीद्वारे सागरी गस्त घालता यावी म्हणून केंद्र शासनाकडून २८ व राज्याकडून २९ अशा ५७ नव्या वेगवान बोटी पुरविल्या जाणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना याचे वाटप केले गेले आहे.
जुन्या १० बोटींसह ६७ बोटींनी तसेच सागरी किनाºयालगतच्या परिसरात जीप, मोटारसायकल व पायी गस्त केली जात आहे. जुन्या २५ सागरी पोलीस ठाण्यांमध्ये १२ नवीन ठाण्यांची भर घातली गेली. आता ४४ सागरी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. जुने ५९ व नव्या ३२ अशा ९१ सागरी चेक पोस्ट कार्यरत आहेत. सुरक्षेची साधनसामग्री व उपकरणे ठेवण्यासाठी पोलिसांकरिता आॅपरेशनल रूमचे बांधकाम केले गेले आहे.

१७६९ पोलिसांची वानवा
सागरी पोलीस ठाण्यांसाठी ४३६८ पोलीस - अधिकाºयांची पदे मंजूर असली तरी सध्या २५९९ एवढेच कार्यरत आहेत. १७६९ मनुष्यबळाची अजूनही वानवा आहे.

साडेसातशे तांत्रिक कर्मचाºयांची कमतरता
वेगवान बोटी चालविण्यासाठी तांत्रिक पोलीस कर्मचाºयांची १००४ पदे निर्माण करण्यात आली असली तरी त्यापैकी केवळ ३४९ कर्मचारी कार्यरत आहेत.

मच्छीमारांच्या १४ हजार बोटी
सागरी किनाºयावर मच्छीमारांच्या १४ हजार २२२ बोटींची नोंद करण्यात आली आहे. ओळख होण्यासाठी जिल्हानिहाय सांकेतिक रंग निश्चित करण्यात आले असून, १३ हजार ९६६ या बोटींचे कलर कोडिंग करण्यात आले आहे. याशिवाय १ लाख ८० हजार ८५६ मच्छीमार बांधवांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप करण्यात आले.

Web Title: Watch over 91 check posts on the coastal shores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.