वॉचमनने भिंतीला होल पाडून सोने व रोख रक्कम केली लंपास

By admin | Published: December 26, 2016 08:19 PM2016-12-26T20:19:42+5:302016-12-26T20:20:29+5:30

शहरातील लालचक्की परिसरात प्रसिद्ध मनप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे.

Watchman broke the wall and made a gold and cash lump sum | वॉचमनने भिंतीला होल पाडून सोने व रोख रक्कम केली लंपास

वॉचमनने भिंतीला होल पाडून सोने व रोख रक्कम केली लंपास

Next

ऑनलाइन लोकमत/सदानंद नाईक
उल्हासनगर, दि. 26 - शहरातील लालचक्की परिसरात प्रसिद्ध मनप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. इमारतीच्या वॉचमनने मध्यरात्री मणप्पुरम गोल्ड कार्यालयाच्या भिंतीला होल पाडून कटर व इतर साहित्याने लॉकरमधील रोख रक्कम व सोने लंपास केले आहे. सकाळी प्लॉटधारकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला माहिती दिल्यावर तपासाची चक्रे फिरली. वॉचमन फरार झाला असून अंदाजे ३० किलो सोन्यासह रोख रक्कम लंपास झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ लालचक्की परिसरातील सार्वजनिक हॉलजवळ शंकर कृपा पॅलेस इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर मणप्पुरम गोल्ड कंपनीचे कार्यालय असून, येथे सोने गहाण ठेवल्यानंतर व्याजावर कर्ज दिले जाते. इमारतीचा वॉचमन करण थापा याने प्लॉटधारकांना विश्वासात न घेता, गावी जाण्यापूर्वी एका अनोळखी नेपाळी इसमाला वॉचमन म्हणून ठेवले होते. तोच काही दिवसापासून इमारतीचा वॉचमन असून इमारतीची साफसफाई व पाणी सोडत होता. सकाळी वॉचमनने पाणी सोडले नाही. म्हणून प्लॉटधारकांनी वॉचमनला हाका दिल्या. मात्र एकही प्रतिसाद न मिळाल्याने इमारतीच्या पाय-या खालील वॉचमन रूममध्ये त्यांनी शोधले असता त्यांना धक्कादायक चित्र दिसले.
वॉचमनची रूम सताड उघडी असून, मणप्पुरम गोल्ड कार्यालयाच्या भिंतीला गोल आकाराचे छिद्र पाडले होते. प्लॉटधारक या प्रकाराने घाबरून त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना झालेल्या प्रकाराचे माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिरसाट यांनी पथकासह पाहणी केली असता इमारतीच्या नवीन वॉचमनने, वॉचमन रूममधून मध्यरात्री कार्यालयाच्या भिंतीला छिद्र पाडले. त्यावाटे कार्यालयात प्रवेश करून गॅस कटरच्या मदतीने लॉकर तोडून रोख रक्कमेसह अंदाजे ३० किलो सोने लंपास केले. मात्र विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून रोख रकमेसह सोने चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इमारतीच्या वॉचमनचे कृत्य पोलीस उपायुक्त नितीन भारद्वाज यांनी घटनास्थळाची पाहणी केली. इमारतीच्या जुन्या करण थापा नावाच्या वॉचमनसह नवीन ठेवलेल्या वॉचमनचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस वॉचमनच्या मागावर असून लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन भारद्वाज यांनी दिली आहे. शंकर कृपा पॅलेस इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती सकाळी दिली. मात्र पोलीस १ तास उशिराने आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. घटना सकाळी होऊनही तपासाला १२ वाजल्याचे बोलले जाते. तर योग्य दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिरसाट यांनी दिली आहे.

- या दरोड्यात ज्या ग्राहकांचं सोनं चोरी झालं आहे. त्यांना पूर्णतः नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. अत्याधुनिक मध्यवर्ती देखरेख सुरक्षा प्रणालीअंतर्गत ग्राहकांचं सोनं सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे. पोलीस चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करतील, असंही मन्नपूरम फायनान्स कंपनीनं म्हटलं आहे. 

Web Title: Watchman broke the wall and made a gold and cash lump sum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.