सुमारे २० कोटींच्या उत्पन्नावर पाणी
By admin | Published: December 3, 2015 12:58 AM2015-12-03T00:58:03+5:302015-12-03T00:58:03+5:30
स्वत:च्या मालकीच्या एसी गाड्या घेण्याच्या नादात भाड्याच्या एसी गाड्या टप्प्याटप्याने महामंडळाकडून हद्दपार करण्यात आल्या. या गाड्या हद्दपार केल्यानंतर आणि नवीन
- सुशांत मोरे, मुंबई
स्वत:च्या मालकीच्या एसी गाड्या घेण्याच्या नादात भाड्याच्या एसी गाड्या टप्प्याटप्याने महामंडळाकडून हद्दपार करण्यात आल्या. या गाड्या हद्दपार केल्यानंतर आणि नवीन गाड्या ताफ्यात येण्यास लागलेला उशीर यामुळे सहा महिन्यांत २0 कोटींहून अधिक उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे.
एसटी महामंडळाकडे सुरुवातीला १२५ एसी शिवनेरी गाड्या होत्या. यापैकी भाडेतत्त्वावरील १५ गाड्यांची मुदत संपल्यानंतर गेली बरीच वर्षे ११0 एसी गाड्या मुंबई, ठाणे या ठिकाणांहून नाशिक, पुणे, औरंगाबादसह काही मोजक्या मार्गांवर धावत होत्या. यापैकी अनेक गाड्या नादुरुस्त होत्या. याबाबत तक्रार करूनही कंत्राटदार दाद देत नव्हते. एसटीत एसी बस सेवांमध्ये कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या ७0 एसी बस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
यात स्वीडनमधील स्कॅनिया कंपनीच्या ३७ आणि व्होल्वोच्या ३३ बसचा समावेश होता. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या ताफ्यातील एसी बस महामंडळाने टप्प्याटप्याने कमी करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे नव्या बस मात्र दाखल झालेल्या नाहीत. सध्या ११0 पैकी ७0 एसी बसच धावत असून गाड्यांच्या कमतरतेमुळे मागील सहा महिन्यात २0 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
- एसी बस सेवांमुळे महामंडळाला वर्षाला जवळपास २00 कोटींचे उत्पन्न मिळते.
- महामंडळाच्या ताफ्यात ३७ स्कॅनिया कंपनीच्या बसही येणार होता. दीड टनापेक्षा जास्त वजन आणि अन्य तांत्रिक चुकांवर आरटीओने व एसटीच्या तांत्रिक विभागाने बोट ठेवल्याने या बस ताफ्यात येण्यास विलंब होत आहे.