पाण्याच्या नियोजनासाठी गावांचे ‘वॉटर बजेट’

By admin | Published: January 16, 2015 05:30 AM2015-01-16T05:30:49+5:302015-01-16T05:30:49+5:30

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी प्रशासनातर्फे जलयुक्त शिवार अभियानामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे.

Water budget for village planning | पाण्याच्या नियोजनासाठी गावांचे ‘वॉटर बजेट’

पाण्याच्या नियोजनासाठी गावांचे ‘वॉटर बजेट’

Next

सुधाकर जाधव, जळगाव
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी प्रशासनातर्फे जलयुक्त शिवार अभियानामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. उपलब्ध पाण्यामध्ये ग्रामस्थ आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतर्फे वॉटर बजेट (पाण्याचा ताळेबंद) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे़
उपलब्ध पाण्यामध्ये मनुष्य, जनावरे आणि शेतीसाठी पाणी याचे नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे़
या दृष्टिकोनातून भूजल सर्वेक्षणतर्फे पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करण्यात आला आहे़ त्यासाठी एक गाव नमुना स्वरूपात निवडण्यात आले आहे़
वॉटर आॅडिट म्हणजे काय?
गावाचे वॉटर आॅडिट करताना गावशिवाराचे क्षेत्र आणि मि़मी़मध्ये पडलेला पाऊस कोटी लिटर्समध्ये मोजण्यात येतो़ गावाच्या एकूण लोकसंख्येला माणसी ४० लिटर, जनावराला २० लिटर पाणी गृहीत धरून शेतीमध्ये हंगामानुसार घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याचे हेक्टरी प्रमाण विचारात घेतले जाते़ ग्रामस्थ, जनावरे आणि शेतीला लागणारे पाणी मोजले जाते़ त्यानुसार त्याचे आॅडिट केले
जाते़

Web Title: Water budget for village planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.