पीपीपी मॉडेलवर राबवणार वॉटर बस प्रकल्प
By admin | Published: July 13, 2015 01:47 AM2015-07-13T01:47:41+5:302015-07-13T01:47:41+5:30
राज्यात वॉटर बस (पाण्याखालून आणि जमिनीवरून धावणारी बस) संकल्पना एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) राबवण्यात येणार
मुंबई : राज्यात वॉटर बस (पाण्याखालून आणि जमिनीवरून धावणारी बस) संकल्पना एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प खर्चिक असल्यामुळे पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागिदारी) मॉडेलवर राबवण्यात येणार असून, त्याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक होणार असल्याचे एमटीडीसीचे व्यवस्थापक (अॅडव्हेंचर स्पोर्ट्स) सुबोध किनलेकर यांनी सांगितले. यातील प्रत्येक बसची किंमत ही जवळपास ३ कोटी रुपये आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून ‘वॉटर बस’हा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प एमटीडीसीने हाती घेतला आहे. यासाठी धरणे, समुद्र याच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज तसेच अन्य माहीती गोळा करण्याची जबाबदारी सल्लागार कंपनीवर असणार आहे.