शहरात उद्या पाणीपुरवठा बंद
By admin | Published: April 27, 2016 01:47 AM2016-04-27T01:47:00+5:302016-04-27T01:47:00+5:30
येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Next
रावेत : येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणारा आहे.
सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा, तसेच विद्युतविषयक तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ज्या भागामध्ये सध्या सायंकाळी एक वेळ पाणीपुरवठा होतो. अशा भागामध्ये गुरुवारी सकाळीच पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. (वार्ताहर)