मराठवाड्यावर जलसंकट!
By admin | Published: July 14, 2015 01:10 AM2015-07-14T01:10:57+5:302015-07-14T01:10:57+5:30
मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची
औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चार जिल्हे टँकरवर अवलंबून असून जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे.
विभागातील सर्व प्रकल्पांत मिळून ५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागणार आहे. आठ जिल्ह्यांत सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक लोकसंख्या आहे. त्यातील ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
६० टक्के लोकसंख्या प्रकल्पातील पाण्यावर, तर ४० टक्के लोकसंख्या विहिरी, हातपंप व टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
मराठवाड्यातील मध्यम ७५, लघु ७२१, गोदावरीवरील बंधारे ११, मांजरा नदीवरील बंधारे १६ अशा ८३४ प्रकल्पांत ७ हजार ९११.२७ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे.
सद्य:स्थितीत विभागातील प्रकल्पांमध्ये ३४५ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, हे प्रमाण ५ टक्के इतके आहे.
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिकांमध्ये
पाणी कपात करावी लागेल,
असे विभागीय आयुक्त डॉ.
उमाकांत दांगट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उद्योगांची पाणीकपात
-जायकवाडी जलाशयात ७.५८ द.ल.घ.मी (०.३४ टक्के) इतका अत्यल्प पाणीसाठा असल्याने औरंगाबाद शहर व अहमदनगरजवळच्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सोमवारी झाला.
जिल्हापेरणी क्षेत्रप्रत्यक्ष पेरणीटक्केवारी
हेक्टरहेक्टर
औरंगाबाद६२९९ ६०३० ९५
जालना५६१४४८२६८५
बीड६१९८४९२१७९
लातूर५५६८३२५२५८
उस्मानाबाद३९२४१८९९४८
नांदेड७५४६६७३०८९
परभणी५३८५२६४५४९
हिंगोली३४०३२२३३६६
एकूण४३९४०३२५३८७५