सात सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:01 AM2017-09-08T04:01:43+5:302017-09-08T04:01:55+5:30
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सात सिंचन प्रकल्पांच्या प्रस्तावांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामूळे सुमारे ८४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पाटण तालुक्यातील वांग मध्यम प्रकल्प, नाशिक जिल्ह्यातील बागलाण या अवर्षण प्रवण तालुक्यासाठीची योजना, सोलापूर जिल्ह्यातील सिनामाढा उपसा सिंचन योजना, सातारा जिल्ह्यातील जिहे कटापूर उपसा सिंचन योजना, उत्तर सोलापूर तालुक्यातील शिंगोली, शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता दिली.