अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यावाचून वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:29 PM2021-09-04T19:29:51+5:302021-09-04T19:31:29+5:30

सरकारी व आरक्षणा खालील जमीनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते.

water to the encroachers but the locals faces water shortage | अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यावाचून वणवण

अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यावाचून वणवण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - सरकारी व आरक्षणा खालील जमीनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते. पण स्वतःच्या मालकी जागेत राहणाऱ्या स्थानिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते अशी परिस्थिती उत्तनच्या केशव सृष्टी जवळील खाडीवर भागातल्या स्थानिकांची झालेली आहे. 

भाईंदर पश्चिमेस उत्तनच्या केशवसृष्टी च्या पुढे असलेला खाडीवर म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. या भागातील स्थानिकांच्या जमिनी व घरे आहेत. गेल्या काही वर्षात येथील जमिनी बाहेरच्यांनी सुद्धा घेतल्या असून त्यांची देखील बांधकामे झाली आहेत. 

या भागात पालिकेने रस्ते, पथदिवे आदी सुविधा दिल्या आहेत. पालिका कर वसुली करते. पण केशवसृष्टी पर्यंत पाणी पुरवठा करणारी पालिका काही अंतरावरच असलेल्या स्थानिकांच्या घरांना पाणी मात्र आजही देण्याची नियत ठेवत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

एकीकडे सरकारी व पालिका आरक्षणातील जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना पालिका झटपट नळ जोडण्या देते. त्यासाठी काही दलाल वा नगरसेवक मध्यस्थ म्हणून अधिकाऱ्यांशी संधान साधून असतात. कागदपत्रे खोटी वा अपुरी असली तरी जोडण्या दिल्या जातात. खास जलवाहिन्या टाकल्या जातात. 

पण उत्तनच्या खाडीवर सारख्या मालकी जमिनीत घरे असलेल्या स्थानिकांना मात्र पाणी देण्यासाठी कमालीची उदासीनता व विविध कारणे दाखवली जातात. 

याभागात पालिकेने जलवाहिनीच टाकली नव्हती. जेणे करून येथील राहिवाश्यांना टँकरचे पाणी घ्यावे लागते. पिण्यासाठी महागडे पाणी विकत घ्यावे लागते. काहीजणांना तर पाण्यासाठी पायपीट करून पाणी आणावे लागते. 

स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी येथे पालिकेने जलवाहिन्या टाकल्या. स्थानिकांनी देखील नळजोडणी साठी पालिके कडे रीतसर अर्ज केले. परंतु आजही लोकांना नळ जोडण्या दिलेल्या नाहीत व पाणी सुद्धा पालिका देत नाही. जेणेकरून महापालिकेने स्थानिकांना पाण्या पासून वंचित ठेवल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण कायम आहे. 
 

Web Title: water to the encroachers but the locals faces water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.