पुण्यातील सोसायट्यांमध्ये रात्री पाणी घुसले, सकाळी ओसरले; नाशकात पाऊस, मराठवाड्यात आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:37 AM2024-08-05T07:37:55+5:302024-08-05T07:38:19+5:30

Pune Rain Alert: पुणे अलर्ट मोडवर : अनेक धरणे तुडुंब : विसर्ग सुरूच, तीन दिवसांत ६ टीएमसी जायकवाडीत

Water entered societies in Pune at night, receded in the morning; Rain alert in Nashik, joy in Marathwada | पुण्यातील सोसायट्यांमध्ये रात्री पाणी घुसले, सकाळी ओसरले; नाशकात पाऊस, मराठवाड्यात आनंद 

पुण्यातील सोसायट्यांमध्ये रात्री पाणी घुसले, सकाळी ओसरले; नाशकात पाऊस, मराठवाड्यात आनंद 

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक/पुणे : तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ४ ऑगस्टपर्यंत साडेसहा दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले असून, ते तहानलेल्या मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरत आहे. अद्याप रिते असलेल्या जायकवाडी धरणात चोवीस तासांत दोन टीएमसी (दलघफू) पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पवना धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने बोपोडीतीन नदी शेजारील सोसायट्यांमध्ये पहाटे ४ वाजता पाणी घुसले होते. काही तासानंतर हे पाणी ओसरले. 

निळवंडेचेही पाणी जायकवाडीकडे 
नाशिक गंगापूर धरण ८६% भरले...: नाशिक शहर व परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ३०.२ तर गेल्या २४ तासांत १०५.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. गंगापूर धरण सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६ टक्के भरले. जलसाठा ४,८३४ दलघफूपर्यंत पोहोचला आहे. 

गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून ८००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यातील धरणातून कडवा आतापर्यंत १ टीएमसी, दारणातून ५.२ टीएमसी, भाममधून १.७ टीएमसी याशिवाय भावली धरणासह गोदावरी कालव्यांमधून एकत्रित ६.४६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, त्र्यंबक, इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातही पाण्याची नव्याने आवक झाली आहे. त्यामुळे मुळा धरण रविवारी ७५ टक्के इतके भरले. निळवंडे धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने तो जायकवाडी धरणात जमा होत आहे.

देशातील पाणीसाठ्यांची पातळी अजून कमीच
नवी दिल्ली : देशभर मुसळधार पाऊस कोसळूनदेखील १५० प्रमुख पाणीसाठ्यांनी अजून गेल्या वर्षीइतकी पातळी गाठलेली नाही. सध्या देशात ६९.३५ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, झारखंडमध्ये खरकाई आणि स्वर्णरखा या दोन नद्यांना पूर आला आहे.
पुणे परिसरातील धरणे भरली असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यातच पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने आपत्ती
व्यवस्थापन कक्षासह प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. एनडीआरएफ व लष्कर तैनात आहे. काही लोकांना
सुरक्षितस्थळी हलवले आहे. 

Web Title: Water entered societies in Pune at night, receded in the morning; Rain alert in Nashik, joy in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.