कोपरीत शिरले घरात पाणी

By admin | Published: July 12, 2014 12:09 AM2014-07-12T00:09:32+5:302014-07-12T00:09:32+5:30

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडला.

Water in the house on the shore | कोपरीत शिरले घरात पाणी

कोपरीत शिरले घरात पाणी

Next
ठाणो : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडला. जिल्हाभरात सकाळर्पयत 552.3क् मिमी पाऊस पडला. महिन्याभरात झालेल्या पावसापैकी हा सर्वाधिक पाऊस आहे. दरम्यान, कोपरीतील पाटीलवाडी परिसरात  12क् घरांत खाडीसह गटारीचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली. तर पाचपाखाडीच्या सावरकरनगरमध्ये व आदर्श सोसायटीजवळ झाड पडून एका घराचे नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात कोठेही जीवित हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
याशिवाय शहरातील अल्मेडा रोड, तलावपाळी, अंबिकानगर, वंदना, मावळी मंडळ आदी भागांत गुडघाभर पाणी साचले होते. वागळे इस्टेटमध्ये हनुमाननगर भागात असलेला जुना रस्ता 6 फूट खचला. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर यावर तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकण्यात आला असून, हा रस्ता सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. सायंकाळी साडेसहा वाजेर्पयत 96 मिमी पावसाची नोंद झाली.  
ठाणो शहरात सर्वाधिक पाऊस (158 मिमी) पडला. यानंतर ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून पाऊस न पडलेल्या तलासरी  तालुक्यात सर्वाधिक  139 मिमी पाऊस पडला आहे. याखालोखाल वाडा, भिवंडी, कल्याण, विक्रमगडमध्ये पाऊस पडला  पडला. तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 4 मिमी पाऊस पडला आहे. जिल्हाभरात सरासरी 36  मिमी या पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
 
उल्हासनगरात रिमङिाम 
च्शहरात रिमङिाम पाऊस झाला. मार्केट परिसरात ग्राहक अत्यल्प असल्यामुळे व्यापा:यांनी सायंकाळीच दुकाने बंद केले. तर  नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा उल्हासनगर पालिका आयुक्त  बालाजी खतगावकर यांनी दिला आहे.
च्उल्हासनगरात फर्निचर मार्केट, गजानन मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, गाऊन मार्केट, जिन्स मार्केट, बॅग मार्केट, जपानी मार्केट आदी मार्केट प्रसिद्ध आहेत. या मार्केटमध्ये दररोज कोटय़वधींची उलाढाल होते. मुंबई, ठाणो, कल्याण-डोबिंवली व राज्यातून ग्राहक खरेदीसाठी येत असतात.  
च्मात्र रिमङिाम पावसाने मार्केट परिसराकडे ग्राहक शुक्रवारी फिरकलेच नाहीत. वालधुनी नदीला पूर आल्यामुळे काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला.
 
 
पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ
च्डोंबिवली : शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये समाधान होते. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळी परतीच्या प्रवासातील चाकरमान्यांसह पादचा:यांचीही त्रेधातिरपीट उडाली. भाजीमार्केटसह रेल्वे स्थानक परिसरात ठिकठिकाणी नागरिक आडोसा शोधत होते. अनेकांनी मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद लुटला. त्यामध्ये लहानग्यांच्या आनंदाला उधाण आले होते. 
च्सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होता. संध्याकाळच्या वेळेत शहराच्या बहुतांश ठिकाणी तसेच हमरस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. 
 

 

Web Title: Water in the house on the shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.