खडकपूर्णा धरणाचे पाणी पेटले
By admin | Published: March 5, 2015 01:21 AM2015-03-05T01:21:07+5:302015-03-05T01:21:07+5:30
मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी देण्यास देऊळगावराजा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
अमोल राऊत ल्ल तळणी
मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी देण्यास देऊळगावराजा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता या प्रश्नावरून मराठवाडा-विदर्भ वाद पेटण्याची शक्यता आहे.
तळणीसह देवठाणा, कानडी, ल्ािंबखेडा, टाकळखोपा व वाघाळा येथील १६ ग्रामस्थांनी देऊळगावराजा (जि. बुलढाणा) येथील खडकपूर्णा प्रकल्पातून उस्वद-देवठाणापर्यंतच्या गावांना पाणी सोडण्यासाठी २०
फे ब्रुवारीपासून पूर्णा नदीच्या पात्रात उपोषण सुरू के ले होते. या उपोषणाची दखल घेत २५ फे ब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊ न १ मार्चला पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. पुढे ३ मार्च ही डेडलाइन देण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांनीही खडक पूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आदेश दिले.
मात्र, खडक पूर्णा प्रकल्पातून पाणी सोडल्यास आंदोलन क रू, असा इशारा देऊ ळगाव येथील शेतक ऱ्यांनी व पाणी बचाव समितीने तहसीलदार व अभियंता यांनी दिल्याने पाण्याचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे ५ मार्च पर्यंत पाणी न सुटल्यास सर्व पक्षीय रास्ता रोक ो आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा तळणीतील उपोषणक र्त्यांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँॅग्रेस, शिवसेनेसह अन्य संघटनांनी दिला आहे.