‘नांदेड सिटी’ला खडकवासलातून पाणी
By Admin | Published: September 16, 2015 12:56 AM2015-09-16T00:56:51+5:302015-09-16T00:56:51+5:30
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खडकवासला येथील मौजे नांदेड येथे विशेष नगर वसाहत प्रकल्पाखाली उभ्या राहिलेल्या नांदेड सिटीला थेट धरणातून कायमस्वरूपी
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खडकवासला येथील मौजे नांदेड येथे विशेष नगर वसाहत प्रकल्पाखाली उभ्या राहिलेल्या नांदेड सिटीला थेट धरणातून कायमस्वरूपी पाणी देण्याकरिता मागील सरकारमध्ये जलसंपदा विभागाने सिंचन क्षमतेमध्ये ८५२ हेक्टरची कपात केली होती.
राज्यातील दुष्काळग्रस्तांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन सुरू असताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे. खडकवासला धरणातून पिण्याकरिता ५.१४ द.ल.घ.मी. पाणी दिले जाते; तर औद्योगिक वापराकरिता १.९८ द.ल.घ.मी. पाणी दिले जाते. पिण्याकरिता व औद्योगिक वापराकरिता वार्षिक ७.८३२ द.ल.घ.मी. पाण्याची मागणी आहे. जलसंपदा खात्याने ३ एप्रिल २००८ रोजी सिंचनाच्या क्षमतेत घट करून ते पाणी नांदेड सिटीकडे वळवले.
खडकवासला धरणातून २७ कंपन्या, गृहनिर्माण प्रकल्प व अन्य बिगर सिंचन प्रकल्पांकरिता पाणी दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसने जेलभरो आंदोलन सुरू केले असले तरी प्रत्यक्षात पुण्यातील खडकवासला धरणातून नांदेड सिटी व अन्य आपल्या निकटवर्तीयांच्या उद्योग व गृहनिर्माण प्रकल्पांना पाणी देताना सिंचनाचे पाणी कमी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात घेतला असल्याने राष्ट्रवादीचे शेतकरी प्रेम बेगडी आहे.
- माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते, भाजपा