कृष्णा खोऱ्यातील पाणी अपायकारक, पशुधनही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:39 AM2018-06-05T05:39:25+5:302018-06-05T05:39:25+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खो-यातील प्रमुख नद्यांचे पाणी प्रदूषित झाले असून ते पिण्यासाठीच नव्हे, तर शेतीसाठीही अयोग्य बनले आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा व वारणा या प्रमुख नद्यांमध्ये झिंक, सिसम, आर्सेनिक अशा विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याचे आढळले.

Water from the Krishna valley, harmful to livestock | कृष्णा खोऱ्यातील पाणी अपायकारक, पशुधनही धोक्यात

कृष्णा खोऱ्यातील पाणी अपायकारक, पशुधनही धोक्यात

Next

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खो-यातील प्रमुख नद्यांचे पाणी प्रदूषित झाले असून ते पिण्यासाठीच नव्हे, तर शेतीसाठीही अयोग्य बनले आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा व वारणा या प्रमुख नद्यांमध्ये झिंक, सिसम, आर्सेनिक अशा विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याचे आढळले.
पाण्याचे हे वाढणारे प्रदूषण मानवी आरोग्यास तसेच पशुधनासही हानिकारक आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषत: शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील नागरिक जागरूक झाले असून पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी ग्रामीण भागात आंदोलने सुरू झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा, कोयना, पंचगंगा व वारणा यासह २४ प्रमुख नद्या आहेत. पश्चिम घाटातून या नद्यांची सुरुवात होते. शहरांचे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, शेतीसाठी केला जाणारा रासायनिक खतांचा बेसुमार वापर यासह विविध कारणांमुळे या नद्यांचे पाणी दूषित झाले आहे. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाणी योजनेचा प्रश्न यामुळेच वादग्रस्त बनला आहे.

आठपैकी पाच ठिकाणांचे नमुने अतिशय दूषित

कोल्हापुरातील नद्यांचे पाणी पिण्यास नव्हे, तर शेतीसाठीही उपयुक्त नाही. यात शरीरास अपायकारक असणारे झिंक, सिसम, आर्सेनिक या घटकांचे प्रमाण वीस ते साठ पटीने अधिक आहे.
- शंकर गौडा, रायचूर कृषी संशोधन विद्यापीठ, कर्नाटक

Web Title: Water from the Krishna valley, harmful to livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी