पेठ गावात उघड्यावर मलनिस्सारणचे पाणी

By Admin | Published: April 28, 2016 03:14 AM2016-04-28T03:14:46+5:302016-04-28T03:16:13+5:30

खारघर सेक्टर ३३ मधील नाल्यात मलनिस्सारणचे पाणी थेट उघड्यावर सोडले जात आहे

Water at the opening of Peth village | पेठ गावात उघड्यावर मलनिस्सारणचे पाणी

पेठ गावात उघड्यावर मलनिस्सारणचे पाणी

googlenewsNext

पनवेल : खारघर सेक्टर ३३ मधील नाल्यात मलनिस्सारणचे पाणी थेट उघड्यावर सोडले जात आहे. यामुळे जवळच असलेल्या पेठ गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या पाण्यामुळे गावात दुर्गंधी पसरली आहे. सिडकोने यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना न केल्यास ओवे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुजाता जोशी यांनी सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला आहे .
खारघर सेक्टर ३३ मधील पेठपाडा गावाजवळील नाल्यामध्ये सेक्टर ३० , ३४, व ३५ मधील रहिवाशांकडून मलनिस्सारणाचे पाणी सोडले जात असल्याने स्थानिक गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिसरात मलेरिया तसेच इतर रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. गावाजवळून जाणाऱ्या या उघड्या नाल्यामध्ये हे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. या नाल्यांना बंदिस्त करणे गरजेचे आहे. वेळोवेळी मागणी करून देखील सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावातील लहान मुलांना देखील यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत. यामुळे लवकरात लवकर सिवरेज लाइनचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा सुजाता जोशी यांनी निवेदनाद्वारे सिडकोला दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water at the opening of Peth village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.