पाणी नियोजनाचा ‘खेळ’खंडोबा

By admin | Published: September 6, 2014 12:17 AM2014-09-06T00:17:34+5:302014-09-06T00:17:34+5:30

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोन वेळा पाणीपुरवठय़ाची मागणी केली आहे.

Water planning 'game' section | पाणी नियोजनाचा ‘खेळ’खंडोबा

पाणी नियोजनाचा ‘खेळ’खंडोबा

Next
पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोन वेळा पाणीपुरवठय़ाची मागणी केली आहे. परंतु, पुढील वर्षभर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी एक वेळ पाणी पुरवठय़ावर महापालिका प्रशासन ठाम आहे. गेल्या 3 महिन्यांत एक दिवसाआड, दोन वेळा आणि एक वेळ असे वारंवार पाणीपुरवठय़ाचे  निर्णय बदलण्यात आले. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजन व यंत्रणोचा खेळखंडोबा होणार आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणांत 1क्क् टक्के साठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही कालव्याने शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. मग, पुणोकरांना एक वेळ पाणीपुरवठा का? असा सवाल शहरातील राजकीय पक्ष व  स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे. धरणो भरल्यामुळे दोन वेळा पाणी देण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे; मात्र वारंवार पाणीपुरवठय़ाच्या नियोजनात बदल करणो अशक्य आहे.  
दर वर्षी धरणो 1क्क् टक्के भरूनही मार्चमध्ये पाणीकपात करावी लागते. त्यामुळे महापालिकेने यंदापासून 31 जुलैऐवजी ऑगस्टअखेर्पयत राखीव साठा ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी पाणीटंचाई  टाळता येईल. (प्रतिनिधी)
 
राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनुसार आयुक्तांनी बैठक बोलावली होती. त्यात एक वेळ  पाणी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 
- व्ही. जी. कुलकर्णी 
पाणीपुरवठा विभागप्रमुख
 
च्शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करायचा झाल्यास महापालिकेला दररोज सुमारे 125क् एमएलडी पाणी लागते. हे पाणी पालिकेकडून दोन वेळा घेऊन ते शुद्धीकरण करून शहराला पुरविण्यात येते. मात्र, महापालिकेची साठवण क्षमता कमी आहे.
च्शिवाय, वितरणव्यवस्थाही 2क् वर्षाहून अधिक जुनी असल्याने दोन वेळा पाण्याच्या वितरणात तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तर, प्रत्यक्षात सर्वात मोठय़ा पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा असलेल्या भागातील केवळ 34 ते 35 प्रभागांमध्येच दोन वेळा पाणी देणो शक्य होते. 
च्उर्वरित प्रभागांमध्ये एक वेळच पाणीपुरवठा होतो, तर दोन वेळा पाणीपुरवठा करताना सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास, असे चार तास पाणी दिले जाते. तर एक वेळच पाणी देण्याचे नियोजन असल्यास सलग पाच ते सहा तास पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणी असल्याचे प्रशासनाचे मत आहे. 
 
पाणीपुरवठय़ाचा लंपडाव 
च्प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या धरसोड वृत्तीमुळे  एक वेळ आणि दोन वेळा पाणीपुरवठा केला जात असल्याने वितरणव्यवस्था वारंवार विस्कळीत होत आहे. धरणातील पाणीसाठयाने तळ गाठल्याने जून महिन्यात एक वेळ पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पाऊस आणखीनच लांबल्याने जुलैच्या दुस:या आठवडयात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा 25 जुलै रोजी एक वेळ पाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दोन वेळा पाणी सुरू करण्यात आले. 
 
पाणी आंध्राला कशाला ?
च्शहराला पाणीपुरवठा करणारी धरणो 1क्क् टक्के भरली आहेत. त्यामुळे यापुढे या धरणांमध्ये पडणारा प्रत्येक थेंब नदीत व कालव्यात सोडून द्यावा लागणार आहे. पुढचे उजनी धरणही 1क्क् टक्के भरले आहे; त्यामुळे नदीत सोडलेले पाणी उजनीमध्येही साठवता येणार नाही व ते तेथून आंध्रमध्ये सोडावे लागेल. महापालिकेने आचारसंहिता लागू होण्यापुर्वी अतिरिक्त पाणी पुणोकरांना दोन वेळा सोडण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 
 

 

Web Title: Water planning 'game' section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.