पाणी प्रश्नी धुळे महापालिका अधिकार्यांना कोंडले
By admin | Published: May 13, 2014 04:00 AM2014-05-13T04:00:44+5:302014-05-13T04:00:44+5:30
महापालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजारी पडलेल्या रुग्णांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन देणार्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठोस आश्वासन मिळाले नाही
धुळे : महापालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजारी पडलेल्या रुग्णांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन देणार्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी उपायुक्त प्रदीप पठारे व अभियंता कैलास शिंदे यांना सकाळी साडेअकरानंतर सुमारे अर्धा तास आयुक्तांच्या दालनात कोंडून ठेवले. हा विषय स्थायी समितीसमोर चर्चेसाठी ठेवण्याचे अश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात एक ते दीड महिन्यापासून अनियमित व दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे काही भागात अतिसार (गॅस्ट्रो), टायफाईड, कावीळ आदी साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे आजारी पडणार्या रुग्णांना महापालिकेने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी लोकसंग्राम पक्षाच्या पदाधिकार्यांनी केली. या आंदोलकांची उपायुक्त पठारे व अभियंता शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत आज बैठक झाली. रुग्णांना नुकसानभरपाई देण्यासंबंधी विषय धोरणात्मक आहे. तसेच आयुक्त दौलतखाँ पठाण मुंबईला आहेत. ते परतल्यावर निर्णय घेऊ, असे पठारे, शिंदे यांनी सांगितले. यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही. चर्चा फिसकटल्याने आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाला कडी लावली. परिणामी, उपायुक्त पठारे, शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी दालनात अडकून पडले. मागणीवर ठोस आश्वासनासाठी आंदोलक अडून बसले. या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीच मध्यस्थी केली.